राजेंद्र पाटील राऊत
आष्टी पोलिसांची धडक कारवाई गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-: आष्टी बोलेरो एमएच 33 7151 या क्रमांकाची गाडी पहिले भरुन चंद्रपुर ला प्रवासी घेवुन जाते बस बंद असल्याने आणि रात्री चंद्रपुर येथून दारु आणतो अशी माहीती आष्टी पोलिसांना मिळाली ऐन दिवाळीत 5 नोंव्हेबर ला राञीच्या सुमारात 3 लांखाची अवैध दारु जप्त केली. गोपनीय माहितीच्या आधारे आष्टी चंद्रपुर मार्गवरील आष्टी चेक पोस्ट फॉरेस्ट नाक्यावर नाकाबंदी करुन महेंद्र बोलेरो थांबवली असता त्यामधे चक्क देशी दारुच्या 50 पेट्या आढळुन आल्या.वाहन क्र एमएच 33 व्ही 7151 यामध्ये दोन आरोपी आढळले व दोन आरोपी फरार झाल्याची माहीती समोर आली आहे. यामध्ये आरोपी नुर अब्दुल रफिख शेख वय वर्ष 29 मु.पो.अहेरी सोहेल शफिक शेख वय वर्ष 25 मु.पो.अहेरी हे दोघे मिळाले आहेत. या गाडीतुन दोन आरोपी फरार झाले आहेत तरी त्यांचा शोध अहेरी पोलिस घेत आहेत सदर आरोपी विरोधात आष्टी पोलिस स्टेशन येथे म दा का 65 (अ) 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुमार सिंह राठोड,बेगलाजी दुर्ग ,रत्नाकर खेकारे,चालक विलास दरो,यांनी केली आहे पुढिल तपास मोरेश्वर करमे करित आहेत सदर आरोपिंना काल चामोशी न्यायालयात हजर करण्यात आले होते.