राजेंद्र पाटील राऊत
कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती कळवण तालुका च्या वतीने कळवण तहसिलच्या नायब तहसीलदार श्रीमती भोईर मॅडम यांना निवेदन देताना कळवण तालुका अध्यक्ष संजय शिंदे,सरचिटणीस भास्कर भामरे,जगदाळे मॅडम,भिकन पवार,जिल्हा कार्याध्यक्ष पि के आहेर,ndpt संचालक सतिश आहेर,रवींद्र निकम,रामदास वाघ व आमलक आहिरे आदींसह शिक्षक उपस्थित होते.
आज रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तपॅ विविध प्रलंबित मागण्यांसंदभाॅत राज्यभर जिल्हाधिकारी,तहसिल कार्यालय,पंचायत समिती कार्यालय समोर धरणे आंदोलन करुन मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मागण्याणमध्ये प्रामुख्याने समग्र शिक्षा अभियान अंतगॅत जि प शाळेतील सवॅ विद्यार्थ्यांना सरसकट मोफत गणवेश,पाञ मुलींना मोफत उपस्थिती भत्ता प्रतिदिन 1रुपये. ऐवजी 25रुपये. करणे,किशोरवयीन मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकीन ,व त्यांची वापरानंतर विल्हेवाटीची सुविधा उपलब्ध करून देणे.,शिक्षण सेवक मानधन 25000 रुपये करणे,सन 2005 नंतरच्या कमॅच्या-यांना जुनी पेन्शन योजना लागु करणे,शिक्षकांच्या बदल्यांची कायॅवाही त्वरीत करावी. जिल्हा व राज्य स्तरावरील आदशॅ शिक्षक पुरस्कार पाप्त शिक्षकांना वेतनवाढ देणे. सलग तीन व पाच अत्युत्कृष्ट कामाब्द्दल वेतनवाढ देणे,वस्तीशाळा शिक्षकांची प्रथम नियुक्ती तारीख सवॅ प्रकारच्या लाभासाठी गृह्य धरणे,मुख्खयालयीन राहणं काढुन टाकणे,केंद्रप्रमुख पदोन्नति प्राथमिक शिक्षकातुन देणे,पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी मिळावी,blo सारखी अशैक्षणीक कामे काढुन घेणे.आदि मागण्यांचे निवेदन कळवण तालुका महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तपॅ कळवण तहसिलच्या नायब तहसीलदार श्रीमती भोईर मॅडम यांना निवेदन देण्यात आले.