राजेंद्र पाटील राऊत
वाखारी येथील कार्तिक चंद्रकात भामरे यांची हरियाणा येथे नॅशनल स्कृस्ती स्पर्धेत निवड
प्रतिनिधी . दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
पनवेल येथे आयोजित १९ वर्षा खालील खुल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत वाखारी येथिल कुस्ती पटू कार्तिक चंद्रकांत (सजन) भामरे व कोपुर्ली ता . पेठ उच्च माध्यमीक विद्यालयातील विद्यार्थी यांनी ६७ किलो वजन गटात पहिला क्रमांक मिळवून पनवेल हरियाना येथे नॅशनल कुस्तीस्पर्धेत निवड झाली .
त्याच्या या यशाबद्दल आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .तसेच वाखारी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थांनी कार्तिक भामरेचे अभिनंदन केले.