राजेंद्र पाटील राऊत
आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलुर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
फुले शाहू आंबेडकर सेवाभावी संस्था द्वारा संचालित आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलुर मध्ये १५ ऑगस्ट २०२१ हा भारतीय स्वातंत्र्य दिन हा खूप उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष सौ. सुनंदा मारोती सोनकांबळे यांच्या हस्ते राष्ट्रपिता म. गांधी व महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय तिरंगा ध्वजा फडकविण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सोनकांबळे एम. एल. सर उपस्थित होते. तसेच ममता मॅडम, ऐश्वर्या मॅडम, प्रियांका मॅडम, सुधा मॅडम, समीक्षा सोनकांबळे, व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता म.गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सोनकांबळे यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी, सामज सुधारकांनी निस्वार्थपणे अविरत संघर्षाने आपल्या भारत देशाला इंग्रजाच्या तावडीतून मुक्त केले. त्यात क्रांतिकारक, भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्रपाल, लाला लचपतराय, हे सर्व मंडळी क्रांतिकारक मार्गाचा स्वीकार करून ब्रिटिश लोकांना शह दिले. तसेच मावलवादी ,जहालवादी,विचार धारेच्या सर्व मंडळींनी वेगवेगळा मार्ग स्वीकारून एकाच धेयासाठी खूप मोठा संघर्ष निस्वार्थ भूमिकेतून केला. हा संघर्ष 1857 पासून ते 1947 प्रयंत सतत सुरू होता. अखेर 1920 च्या नंतर म. गांधीच्या नेतृत्वाखाली सनदशीर मार्गाने 15 ऑगस्ट 1947 पर्यंत हा लढा वेगवेगळे रूप धारण करत यशस्वीपणे लढला गेला शेवटी इंग्रजांना भारतीय विरपुरूषापुढे नमते घ्यावे लागले त्यानुसार जवळपास 200 वर्ष निर्विवाद वर्चस्व निर्माण करणाऱ्या सत्तेला माघार घ्यावे लागले. त्यानंतर स्वतःचे राज्य स्वतःकडे खेचून आणण्यात यश आले याचे सर्व श्रेय शुर वीर, पराक्रमी, क्रांतिकारी, योद्धे, तसेच असंख्य वीर जवान, महान नेते, समाजसुधारक , सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधी, प. जवाहरलाल नेहरू , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकसंघ भारताची घटना लिहिली त्यातून लोकशाही अमलात आली अशा प्रकारे ज्ञात अज्ञात अशा असंख्य देशवासीयांच योगदान भारतीय स्वातंत्र्यासाठी लागले आहे. याचे सविस्तर मार्गदर्शन आपल्या व्याख्यानातून मांडले.