Home Breaking News देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघातील २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर

देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघातील २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर

171
0

देगलूर – बिलोली विधानसभा मतदारसंघातील २०८ कोटींची रस्ते सुधारणा कामे मंजूर

नांदेड प्रतिनिधी / राजेश भांगे

देगलूर मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी कंबर कसली असून, नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल २०८ कोटी रुपयांची ३२ विकासकामे मंजूर करण्यात आली.

पालकमंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघातील कामांमध्ये राज्य मार्गांच्या सुधारणेची २८ कोटी ७५ लाख रूपयांची ४ कामे तर जिल्हा व इतर मार्गांच्या सुधारणेची १७९ कोटी २१ लाख रूपयांच्या २८ कामांचा समावेश आहे. या कामांसाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सदर कामांच्या निविदा तात्काळ काढून सदर कामे प्राधान्याने पूर्ण होणार आहेत. देगलूर-बिलोली मतदारसंघातील सामान्य नागरिकांना या कामांचा मोठा लाभ होणार आहे. ही कामे मंजूर झाल्यामुळे नागरिकांमध्ये मागणी पूर्ण झाल्याचे समाधान व्यक्त होते आहे.

पुरवणी मागण्यांमध्ये मंजूर झालेल्या कामांमध्ये दावणगिर ते लोणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ९ कोटी रूपये, बिलोली ते कुंडलवाडी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १५ कोटी रूपये, राज्य मार्ग २६८ वरील पुलाचे बांधकाम अंदाजित खर्च ४ कोटी रूपये, राज्य मार्ग २२५ वर दुभाजकाचे काम अंदाजित खर्च ७५ लाख रूपये, भोकसखेडा ते कावळगाव मार्गाची सुधारणा व कावळगावनजिकच्या पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च १० कोटी रूपये, हिप्परगा ते देगलूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३.५० कोटी रूपये, बल्लूर ते माळेगाव मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३.७० कोटी रूपये, प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०६ ते राज्य सीमा तसेच मरतोळी गावातील सीसी रस्ता अंदाजित खर्च ३.५० कोटी रुपये, खुतमापूर ते राज्यसिमा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ५ कोटी रूपये, भुतन हिप्परगा ते भुतन हिप्परगा फाटा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.१० कोटी रूपये, खतगाव ते कोटेकल्लूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २ कोटी रूपये, क्षीरसमुद्र ते बेंबरा तांडा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ७ कोटी रूपये, येडूर ते मानूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.८६ कोटी रूपये, शिळवणी हाणेगाव ते भुतन हिप्परगा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च २.३० कोटी रूपये, शहापूर ते करेमलकापूर मार्ग सुधारणेची दोन कामे अंदाजित खर्च ३.७८ कोटी रूपये, तुंबरपल्ली ते शिळवणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ४.५० कोटी रूपये, चैनपूर ते शहापूर मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १.३५ कोटी रूपये, बिलोली शहर वळणरस्ता भूसंपादन अंदाजित खर्च १७ कोटी रूपये, भोसी ते राज्य मार्ग क्र. २२५ पर्यंतच्या रस्त्याची सुधारणा अंदाजित खर्च ४ कोटी रूपये, लोहगाव ते किनाळा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ४.५० कोटी रूपये, हुनगुंदा ते शिरसखोड मार्गाच्या सुधारणेची दोन कामे अंदाजित खर्च ३५ कोटी रूपये, खैरगाव ते लोहगाव मार्गाची सुधारणा अंदाजित २ कोटी रूपये, डोणगाव खु. ते डोणगाव बु. मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ३ कोटी रूपये, बिलोली तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ४२ वरील गोदावरी नदीच्या पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च ३.५० कोटी रूपये, बिलोली तालुक्यातील मांजरा नदीवरील पुलाची दुरुस्ती अंदाजित खर्च ३.५० कोटी रूपये, कांगठी ते बेळकोमी व रुद्रापूर ते बामणी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ८.८५ कोटी रूपये, दुगाव आणि आरळी ते दौर तसेच दौर ते रामा मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ९.४७ कोटी रूपये, बेटमोगरा ते आळंदी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च १२.८० कोटी रूपये, लघूळ ते सगरोळी मार्गाची सुधारणा अंदाजित खर्च ५.१० कोटी रूपये ही कामे समाविष्ट आहेत. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी देगलुर विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांसाठी एवढा मोठा निधी मंजूर करून घेतला त्याबद्दल त्यांचे या भागातील जनतेने आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here