राजेंद्र पाटील राऊत
NDCC बँक घोटाळा…
नाशिक जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांच्याकडून तपास काढला..
नगरचे जिल्हा उपनिबंधक श्री. दिग्विजय आहेर साहेब नवे तपास अधिकारी…
शिवसंग्राम युवक आघाडी प्रदेशाध्यक्ष उदयकुमार आहेर यांची माहीती…
– (युवराज देवरे प्रतिनिधी/युवा मराठा न्युज नेटवर्क)
NDCC बँकेच्या 300 लाख रुपये घोटाळ्याचा तपास नाशिक जिल्हा उपनिबंधक सतिश खरे यांच्याकडून काढला असून सहकार आयुक्त श्री. अनिल कवडे साहेब,पुणे व नाशिक विभागीय सह निबंधक सौ. लाठकर यांनी पारदर्शक तपास होण्यासाठी अहमद नगरचे जिल्हा उपनिबंधक श्री. दिग्विजय आहेर साहेब यांची
नवे तपास अधिकारी म्हणुननियुक्ती केली आहे. घोटाळ्याची व्याप्ती मोठी व जिल्हाभर असल्याने सहाय्यक म्हणुन हवेत तितके अधिकारी व कर्मचारी नेमण्याची तपास अधिकाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.
यात जिल्हा बँकेसह जिल्हाभरातील जवळपास 300 विविध कार्यकारी सोसायट्या, त्यांचे गट सचिव यांचीही चौकशी करण्याचे तसेच याविषयी लेखा परीक्षण करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शेतकरी, ठेवीदार व पगारदार यांच्या हक्काचे लाखो रुपये बँकेत असतांना फक्त 5 हजाराची रक्कम देण्यात येते* आणि जिल्हाभरातील गटसचिवांना नियमबाह्य़ पद्धतीने पगाराच्या व्यतिरिक्त सानुग्रह अनुदान म्हणुन प्रत्येकी 2 महिन्यांचे एकत्रित पगार इतकी रक्कम देण्यात आली व त्यातील अर्धी रक्कम बँकेचे शेतकरी नियुक्त पदाधिकारी, काही संचालकांनी व सहकार विभागातील जिल्हास्तरीय अधिकाऱ्याने आपसात वाटून घेतल्याचे पुरावे हाती लागले आहेत.
असे घोटाळे व भ्रष्टाचार टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँकेचे संचालक व कार्यकारी सोसायट्यांचे संचालक निवडतांना भ्रष्ट मनाच्या लोकांना पैसे घेवुन मत न देता. चांगल्या व प्रामाणिक लोकांना निवडून द्यावे, असे आवाहन उदयकुमार आहेर यांनी केले आहे.
दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकरी व ठेवीदारांमधून करण्यात येत आहे.