राजेंद्र पाटील राऊत
युवा मराठा न्युजचे संपादक राजेंद्र पवार यांची नाशिक जिल्हा ग्रंथालय सेलच्या मालेगाव तालुका अध्यक्ष पदी निवड
सटाणा,-जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रंथालय सेलच्या मालेगांव तालुका अध्यक्षपदी युवा मराठा न्युजचे संपादक व व-हाणे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र तुकाराम पवार यांची निवड करण्यात आली.राजेंद्र पवार हे व-हाणे येथील रहिवाशी असून,त्यांचा विविध सामाजिक चळवळीत विशेष सक्रीय सहभाग असतो. आज सटाणा येथे पार पडलेल्या कार्यक्रमात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार व ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते राजेंद्र पवार यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.त्याप्रंसगी मा. आ. श्री संजय नाना चव्हाण,माजी आमदार सौ.दिपिका चव्हाण, ओ.बी सी सेल जिल्हा अध्यक्ष श्री समाधान जेजुरकर राष्ट्रवादी सटाणा तालुका अध्यक्ष श्री शैलेश सुर्यवंशी मा.जि. प.सदस्य श्री यशवंत शिरसाठ शहर अध्यक्ष श्री राजेन्द्र सोनवणे.व कार्यकर्त उपस्थित होते .राजेंद्र पवार यांच्या या निवडीचे युवा मराठा महाराष्ट्राच्या वतीने मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत,व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव,कार्यकारी संपादक संजय महाले आदीनी व युवा मराठाच्या सगळ्या पत्रकार ब्युरो चीफ प्रमुखांनी अभिनंदन केले आहे.