Home Breaking News कपार भवानी, बागलाण. बागलाण मधील जवळपास सर्वच प्राचीन मंदिरे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी...

कपार भवानी, बागलाण. बागलाण मधील जवळपास सर्वच प्राचीन मंदिरे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहेत. त्यातील एक म्हणजे कपार भवानी. आपल्यातील बहुतेकांना प्रश्न पडला असेल, आता हे कुठे आलं? सटाण्यातील फार कमी लोकांना या ठिकाणाची माहिती आहे.

565
0

कपार भवानी, बागलाण.
बागलाण मधील जवळपास सर्वच प्राचीन मंदिरे एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वसलेले आहेत. त्यातील एक म्हणजे कपार भवानी. आपल्यातील बहुतेकांना प्रश्न पडला असेल, आता हे कुठे आलं? सटाण्यातील फार कमी लोकांना या ठिकाणाची माहिती आहे. जगदिश बधान विभागीय संपादक युवा मराठा न्युज
कपार भवानी हे गूढ निसर्गरम्य ठिकाण. उत्तर महाराष्ट्रात सह्य़ाद्री डोंगररांगेच्या सुरुवातीस असलेले बागलाणच्या ढोलबारी डोंगररांगेत हे ठिकाण आहे. मुल्हेर किल्ल्यापासून फक्त दोन किमी अंतरावर. मुल्हेर गावापासून साल्हेरकडे जाताना जामोटी हे गाव लागते. या गावात हरगड किल्ल्याची एक सोंड उतरली आहे. जामोटी हे गाव तसे पाहायला गेले तर संपूर्ण डोंगररांगेने आणि पाण्याच्या पाट-कालव्यांनी वेढलेले, गावात मोजक्याच तीस-चाळीस झोपडय़ा असतील; पण देवीच्या मंदिर पायथ्यापर्यंत गावकऱ्यांनी मार्ग बनवलेला आहे. पायथ्यापासून साधारण ३०० फूट उंचीवर हरगडावर ही देवी एका ६५ फूट निसर्गनिर्मित आणि किंचितश्या मानवनिर्मित कपारीत स्थित आहे. म्हणूनच तिला कपार भवानी म्हणतात. लेणी असावी अशी या ठिकाणी रचना जाणवते.
कपारभवानीपर्यंत जाताना एका ठिकाणी विसावण्याचा मोह आपल्याला होतोच, पण आपण दमलो म्हणून नाही तर समोर दिसणाऱ्या सेलबारी दुर्गशृंखलेमुळे. अथांग पसरलेले हरणबारी धरण, बाजूला मांगीतुंगी, तांबोळ्या सुळका, न्हावीगड, शेंदोडगड ही शिखरे आपल्याला बोलवत असतात. जणू हात लांबवून आमंत्रण देत असतात. त्यात डावीकडचा हरगड किल्ला आपल्याला त्याचे राकट स्वरूप दाखवत असतो व उजवीकडील जिभ्या सुळक्याचा तीक्ष्णपणा आपल्याला आणखी चेव आणत असतो. खरं तर हरगडावरच हे मंदिर आहे. सह्य़ाद्रीच्या रौद्र दर्शनानंतर पुन्हा चढाई करून माथ्यावर पोहोचलो की, तेथील सुंदर धबधब्याने नव्याने तजेला मिळतो. निव्वळ निखळ शांतता, एका लयीत येणारा खळखळ असा मंद आवाज आणि मधूनच एखाददुसऱ्या मोरांचे ओरडणे. धबधब्याचे तुषार अंगावर पडू लागताच कपारीसमोर पोहोचतो. काळ्याकुट्ट अंधारात देवीजवळचा दिवा शांतपणे लुकलुकत असतो. त्याचा वेध घेत गुहेत जायचे. मग दिसते ती अनोखी शिल्पकला. डोंगरात कोरलेली अष्टभुजा व अष्टफुटी भवानी मातेची मूर्ती. तिच्या हातातील शस्त्रे आणि चेहऱ्यावरील तेज पाहून सर्व थकवा निघून जाातो. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठीचे उग्र रूपपण जाणवू लागते. मूर्ती अभ्यासकांच्यामते मूळ मूर्ती महिषासूरमर्दीनीची असावी. तिच्या पायाशी रेडय़ाचे डोके असल्यासारखे दिसते. मूर्तीची ठेवण पाहता मूर्ती फार जुनी असावी असे वाटत नाही. पण मूर्ती रिलिफमध्ये कोरलेली दिसते. पूर्णपणे सुटी अशी कोरलेली नाही.कपार भवानी बागलाण,
वरच्या कडय़ावरून कोसळणारा बारमाही धबधबा, समोरील डोंगरावरील गुहा पुन्हा एकदा आपले लक्ष वेधतात. त्यामुळे कॅमेरा हातात घेतल्याशिवाय स्वस्थ बसवत नाही. खूपच अद्भुत आणि अध्यात्मिक असे निसर्गरम्य पवित्र तीर्थक्षेत्र आहे. शेकडो मोर आणि १२ माही धबधबे केव्हाही स्वागतास तयार असतात. त्यामुळे हरपून जायला होते. म्हणून आयुष्यात एकदा तरी नक्की बघावे असे हे ठिकाण आहे.
अतिशय निसर्गसुंदर असे हे स्थळ आहे. ही देवी पायथ्याशी असलेल्या जामोटी आणि मुल्हेर गावातील शेकडो लोकांची कुळस्वामिनी आहे. परंतु शासकीय स्तरावरून होत असलेले दुर्लक्षामुळे एक चांगले पर्यटन स्थळ जंगलात झाकले गेले आहे.
कसे पोहोचणारः
नाशिक ➡️सटाणा ➡️ताहाराबाद ➡️मुल्हेर ➡️जामोटी ➡️कपार भवानी मंदिर.

Previous articleकार्य विश्वासाचे !! कार्य जनसेवेचे !! काम वचनपूर्तीचे !! काम शिवसेनेचे !!
Next articleदिव्यांग बाधव आपल्या हक्कासाठी मुखेड तालुक्या तील सलगरा फाटा ग्रामपंचायत कार्यालय समोर दिव्याग संघटनेचे ता. अध्यक्ष आर एम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि.28 जुन 21 ते रोजी थालीनांद आंदोलनात सरपंच ग्रामसेवक यांनी निवेदन स्वीकारून दिव्यांगाचे प्रश्न सोडविण्याचे दिले आश्वसन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here