Home Breaking News प्रा.टी.डी.खतकर सेवानिवृत्त

प्रा.टी.डी.खतकर सेवानिवृत्त

119
0

प्रा.टी.डी.खतकर सेवानिवृत्त

कोल्हापूर : अतिशय साधी राहणी,बोलण्यात आपुलकी, शांत, साधा नि सरळ स्वभाव,हसरा चेहरा,यामुळेच सर सगळ्यांना आपले वाटतात, नाटाळांना रागाने नाही तर प्रेमाने सांगून सुधारण्यात सरांचा हातखंडा,असे विद्यार्थी प्रिय
प्रा.बाळासाहेब उर्फ टी.डी.खतकर यांना सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील आयुष्यातही ऊत्तम आरोग्य लाभावे असे मत वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले.
घुणकी येथील प्रा.खतकर वारणा महाविद्यालयात व्होकेशनल बँकिंग विषयावर अध्यापनाची ३० वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त महाविद्यालयाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात डॉ. चिकुर्डेकर बोलत होते.
प्रा. डी.एस. पवार यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. पी.एस.राऊत, व्ही.बी. बुढ्ढे, बी .जे . लाडगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा. संध्या साळोखे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा.डॉ.ए.आर. भूसणार यांनी आभार
मानले.
प्रा. खतकर यांना पुण्यातील विजेता फौंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असून
घुणकीच्या रसिक रंजन वाचनालयाचे संचालक, भैरवनाथ वारणा पाणी पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष, वारणानगर येथील सत्कार्य संवर्धन मंडळावरही सेवाभावी वृत्तीने गेली अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांच्या पत्नी
सुनिता खतकर यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल वारणा सहकारी साखर कारखान्याचा “ऊसभूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here