राजेंद्र पाटील राऊत
धक्कादायक ! ग्रामपंचायतला पत्र देऊन आठ दिवस झाले, तरी मास्क नाही, सॅनिटाइझर नाही?
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
चक्क वाढते रुग्ण पाहता सदस्याने दिल्या स्वखर्चाने वस्तू
आशा आणि
आरोग्यसेविका जीव धोक्यात घालून प्रत्येक गावात काम करत आहेत. गाव पातळीवरील माहिती जिल्हा पातळीवर देत हा संसर्ग रोखण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.गेल्या दीड वर्षांपासून त्या कुटुंब व आशासेविका अशा दुहेरी भूमिका पार पाडत आहेत.त्यांच्या या कामाची दखल घेत मोटेवाडी येथील गावकऱ्यांनी आरोग्य सेविका डॉ. श्रीराम मॅडम, आशा सेविका सोनाली वायदंडे,आशा सेविका दोलतडे यांचा त्यांच्या या गावसेवेबद्दल सत्कार करून यापुढे गाव कोरोनामुक्त झाले पाहिजे असा प्रयत्न करावा अशी आशा व्यक्त केली.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मोटेवाडीतील ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते ॲड.संजय रामचंद्र माने पाटील यांनी आशा वर्कर्सच्या कार्याची दखल घेत त्यांना साड्या देऊन व फेटे बांधून सत्कार केला व त्यांनी त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीच, शिवाय गावातील सर्व जण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.तसेच इथून पुढे कोणतीही अडचण आल्यास निसंकोच मदत मागा आम्ही गावकरी तुमच्यासोबत आहोत असे त्यांनी आवाहनही केले.
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मोटेवाडी येथे सॅनिटीझर, मास्क वाटप करताना आरोग्य सेवक व आशा वर्कर्स यांनी ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभाराचा पाढाच ग्रामपंचायत सदस्य ॲड.संजय रामचंद्र माने पाटील यांच्यापुढे वाचला. 8 दिवस झाले ग्रामपंचायत ला पत्र देऊन अजूनपर्यंत मास्क ,सॅनिटीझर,ऑक्सिमीटर या छोट्या वस्तू देखील ग्रामपंचायत वेळेवर पुरवत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.यामुळे येणाऱ्या अडचणी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य माने पाटील यांच्या कानावर घातल्या.ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करत संजय माने यांनी ताबडतोब ग्रामसेवकाला फोन वर संपर्क करून आरोग्य विभागाच्या झालेल्या गैरसोयबद्दल जाब विचारत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.तसेच आजच्या आज इथे वस्तू मिळाल्या पाहिजेत अशी तंबी ही दिली.याचबरोबर स्वतः माने पाटील यांनी स्वखर्चाने N-95 मास्क,सॅनिटायझर,ऑक्सिमीटर एका तासाच्या आत आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिले.याची दखल घेत ग्रामसेवक यांनी यानंतर काही वेळाने मास्क व सॅनिटाइझर उपलब्ध करून दिले.
गावात येणाऱ्या प्रत्येक माणसाची सर्व माहिती संकलित करणे, होम क्वारंटाईन असलेल्या लोकांशी संपर्क ठेवत त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, अशी जोखमीची कामे आशा व आरोग्य सेवक व आरोग्य सेविका बजावत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेत मोटेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य ॲड.संजय रामचंद्र माने पाटील
यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.यावेळी त्यांचे विश्वासु सहकारी वैजिनाथ पालवे, पोलीस पाटील विष्णू तरडे,तानाजी खरात,राष्ट्रवादीचे युवा नेते हनुमंत नामदास,जगन्नात नामदास यांनी त्यांच्या या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
मात्र आता देश कोरोना संकटात असताना, या संकटातून बाहेर काढण्यासाठी आशावर्कर्स लढत आहेत, त्यांच्या कार्याला सलाम करुन, त्यांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी भारतीय संस्कृती जपत त्यांचा साड्या देऊन सत्कार केला अशी भावना ॲड.संजय माने पाटील यांनी बोलून दाखवली.आशासेविका सोनाली वायदंडे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.