राजेंद्र पाटील राऊत
चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी तब्बल सव्वा सहा लाख रुपये वर्गणी जमा केली.
प्रतिनिधी= किरण अहिरराव
चांदवड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांनी तब्बल सव्वा सहा लाख रुपये वर्गणी जमा करून कोरोना परिस्थितीशी सामना करण्यासाठी ५ ऑक्सीजन मशीन, आरोग्य केंद्रात फेबीफिव्हर गोळ्या , तालुक्यातील सर्व आशा कार्यकर्त्यींना कोरोना पासून संरक्षणासाठी फेसशील्ड वाटप करण्यात आले. वडाळी येथील आशा कार्यकर्त्यींना फेसशिल्ड चे वाटप करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा माजी पं. समिती उपसभापती नितीन दादा आहेर, जि प सदस्य कविताताई धाकराव, वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी वृंद तसेच सर्व शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.




