Home कोल्हापूर यड्राव येथील आँक्सिजन प्लांन्ट लिक्विड अभावी बंद

यड्राव येथील आँक्सिजन प्लांन्ट लिक्विड अभावी बंद

168

राजेंद्र पाटील राऊत

यड्राव येथील आँक्सिजन प्लांन्ट लिक्विड अभावी बंद

(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर )
इचलकरंजी : यड्राव येथील महालक्ष्मी ऑक्‍सिजन फ्लांटला लिक्विड पुरवठा मिळला नसल्यामुळे काल रात्रीपासुन बंद झाला आहे. शिरोळ तालुक्यातील वेगवेगळे कोव्हीड सेंटर आणि शासकीय रुग्णालयांना दिला जाणारा ऑक्‍सिजन गॅस पुरवठा खंडित होणार आहे. सध्या सर्व रूग्णालयाकडे दोन दिवसच पुरेल इतकाच ऑक्सिजन आहे. त्यामुळे शासनाने वेळेत लिक्विड पुरवठा केला नाही, तर रूग्णालय, कोव्हीड सेंटर आणि रुग्णांचे जीवाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बाब गंभीर असून प्रशासनाने वेळीच कार्यवाही करणे गरजेचे आहे.
ऑक्सिजन गॅस लिक्विड पुरवठा संदर्भात महालक्ष्मी गॅसचे मॅनेजर अमर तासगावे यांच्याशी संपर्क साधला असता, ऑक्‍सिजन फ्लांट बंद पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देऊन म्हणाले की, महालक्ष्मी ऑक्सिजनला पुणे येथील एका कंपनीकडून गॅस लिक्विड पुरवठा केला जातो.
शिवाय त्यांनी लिक्विड टाकी भाड्याने दिली असल्याने त्यांच्याकडूनच लिक्विड घेणे अनिवार्य आहे. त्यांनाही लिक्विड पुरवठा करणे बंधनकारक आहे.
दरम्यान पुणे अन्न आणि औषध प्रशासनाने पुणे येथील तीन लिक्विड कंपन्या ताब्यात घेवून विदर्भ, मराठवाडा येथे पुरवठा करण्यास बंधन घातले आहे. त्यामुळे कमी पडणाऱ्या लिक्विडची मागणीच करता येत नाही. कोल्हापूर जिल्ह्याला सात दिवसातून केवळ एकदाच १४ टन लिक्विड मिळते. यावर जिल्हाधिकारी यांचे नियंत्रण आहे. ते सांगतील तिथेच पुरवठा होत आहे.
लिक्विड तुटवडा कमी करायचा असेल तर शासनाने २५ टन क्षमता असलेल्या कोल्हापूर ऑक्सिजन कंपनीचा गोव्याला जाणारा ११ टन ऑक्सिजन पुरवठा थांबवून सर्व ऑक्सिजन कोल्हापूरला दिला तर नक्की तुटवडा दुर होईल. सध्या याच कंपनीतील ऑक्सिजन कोल्‍हापुरमधील सीपीआर, डी. वाय. पाटील हॉस्पिटल बावडा, अँस्टर आधार हॉस्पिटल, इचलकरंजी यांच्यासह रत्नागिरी, सातारा आणि मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठा होत आहे.
यातून उरलेला ऑक्सिजन मोठ्या हॉस्पिटलला दिला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी बेल्लारी हॉस्पिट येथून दररोज २४ टन इतके लिक्विड उपलब्ध होत आहे. हेच लिक्विड केंद्र शासनाने पन्नास टनापर्यंत पुरवठा केला, तर सर्व समस्या दूर होणार आहेत. या शिवाय पुण्यातून अल्टरनेट पद्धतीने लिक्विड मिळाले तर कोल्हापूरचा ऑक्सिजनचा प्रश्न निकाली निघणार आहे.

Previous articleपालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण
Next articleनांदेड येथे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न – १०७ बाटल्या रक्त संकलीत
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.