राजेंद्र पाटील राऊत
खताच्या वाढलेल्या किंमती कमी करा.खता-बियाण्यांचा लॉकडाऊनमध्ये काळाबाजार होणार नाही,यासाठी यंत्रणा राबवा:-शिवशंकर पाटील कलंबरकर
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
यावर्षीपासून खताच्या डीएपी,10:26:26 व 12:32:16 या कंपन्यांनी प्रति 50 किलो बॅगमागे 700 रुपयांची वाढ करण्याचे घोषित केले आहे.एकावर्षात प्रतिबॅगमागे 700 रुपयांची वाढ ही सरळसरळ शेतकऱ्यांची लूट आहे.आणि ही वाढ शासनाने रद्द केली पाहिजे.लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन,खत-बियाण्यांमध्ये मोठा काळाबाजार होण्याची शक्यता आहे.हा काळाबाजार होऊ नये,यासाठी यंत्रणा राबविण्यात आली पाहिजे,अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे कृषी कार्यालयामार्फत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.
गेले वर्षी पेरणीपूर्व लॉकडाऊन होते.त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे आले.शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाल्यामुळे दुबार पेरणी करावी लागली.काही शेतकऱ्यांना तिहेरी पेरणीचा खर्च उचलावा लागला.बोगस बियाण्यांचे प्रशासनाने पंचनामे केले.आजही ते पंचनामे कार्यालयात धूळ खात पडले आहेत.त्याची कोणतीही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.आणि ज्या कंपन्यांनी बोगस बियाणे बाजारात घेऊन आले.त्यांचे बियाणे रद्द केले नाही.म्हणून,शेतकऱ्यांना यावर्षी बोगस बियाण्यांचा सामना करावा लागू नये,यासाठी पेरणीपूर्व यंत्रणा राबविण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.
लोकडाऊनच्या सावटाखालीच पेरणी होण्याची शक्यता आहे.आणि पेरणीमधील शेतकऱ्यांच्या खत-बियाण्यांची गरज लक्षात घेऊन,मोठ्या प्रमाणात खत-बियाण्यांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे.खत-बियाण्यांचा काळाबाजार होऊ नये,यासाठी यंत्रणा राबविण्यात आली पाहिजे अशी मागणी कृषिमंत्री कार्यालयाकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केली आहे.