राजेंद्र पाटील राऊत
ठेंगोडा,(नयन शिवदे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास सटाणा देवळा रस्त्यावर असलेल्या द-हाणे फाटयाजवळ एका पल्सर मोटरसायकल स्वाराचा व ट्रकचा भीषण अपघात झाला असून, मोटरसायकलस्वार जागीच ठार झाल्याचे वृत आहे.तर अन्य एक जण गंंभीर असल्याची माहिती मिळत आहे.मोटरसायकलस्वार बिजोटे ता. सटाणा येथील रहिवाशी असल्याचे समजते.ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सटाणा पोलिस स्टेशनला सुरु असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.