Home माझं गाव माझं गा-हाणं शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद: राजेंद्र अहिरे

शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद: राजेंद्र अहिरे

175

राजेंद्र पाटील राऊत

शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद: राजेंद्र अहिरे

नाशिक,(राजेंद्र वाघ प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- लाँककडाऊन काळात राज्यातील शिक्षक एकत्र येत ‘शिक्षक ध्येय’ नावाने साप्ताहिक सुरू करावे हे कार्यच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार नाशिकच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी केले.
राज्यातील शिक्षकांतर्फे प्रकाशित होत असलेल्या शिक्षक ध्येयच्या प्रथम वर्धापन दिनाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, राज्यातील शिक्षकांना या निमित्ताने एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा, यात सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी त्यांनी शिक्षकांना केले.
२० एप्रिल २०२० ला डिजिटल साप्ताहिक शिक्षक ध्येयचे ऑनलाईन प्रकाशन दै. सकाळचे तत्कालीन संपादक श्रीमंत माने यांचे हस्ते झाले होते. ता. ३० सप्टेंबर २०२० रोजी शिक्षक ध्येय डॉट कॉम या संकेतस्थळाचे लोकार्पण दै. सकाळचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांचे हस्ते झाले.
वर्षभरात पन्नास अंक नियमित प्रकाशित करून त्यांचे ३३४ व्हाट्सएप ग्रुप, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम तसेच संकेतस्थळाच्या माध्यमांतून सुमारे तीन लाख शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हे साप्ताहिक नियमित पोहचत आहे. शिक्षक ध्येयचे राज्यात ९२ शिक्षक प्रतिनिधी कार्यरत आहेत, असे शिक्षक ध्येयचे संपादक मधुकर घायदार यांनी सांगितले.

Previous articleलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू – अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
Next articleनायगाव येथे जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांच्या हस्ते कोव्हिड सेंटरचे शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.