Home मुंबई लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू – अन्न,नागरी पुरवठा...

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू – अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

212

राजेंद्र पाटील राऊत

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू – अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ

राजेश एन भांगे

 

मे आणि जून महिन्यात मिळणार मोफत ५ किलो अतिरिक्त धान्य…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी देखील केली होती केंद्राशी चर्चा –

मुंबई, महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री पियुष गोयल आणि खा.शरदचंद्रजी पवार यांना पत्र लिहून केली होती.
या योजनेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला असून आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जुन महिन्यांसाठी मोफत ५ किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याला अटकाव घालण्यासाठी महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे राज्यातील गरीब आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच हे कोरोनाचे संकट कमी करण्यासाठी महाराष्ट्राला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेची पुन्हा एकदा गरज असल्याची मागणी केली होती.
यासंदर्भात खा.शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना देखील केंद्र सरकारशी चर्चा करण्याची विनंती केली होती. खा.शरद पवार यांनी देखील या पत्राचा तातडीने विचार करत केंद्र सरकारशी चर्चा केली आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी सध्या १.४० लाख मेट्रिक टन तांदळाची तर २.४० लाख मेट्रिक टन गव्हाची गरज असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या ७ कोटी लाभार्थ्यांपर्यंत आपण हे धान्य पोहचवू शकतो असे मत प्रधानमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात मांडले होते. आज केंद्र सरकारने घोषीत केल्याप्रमाणे देशात ८० कोटी नागरिकांना मे आणि जुन महिन्यांमध्ये ५ किलो अतिरिक्त धान्य मोफत दिले जाणार आहे. अन्न, सुरक्षा योजनेचे लाभार्थी असलेल्या राज्यातील सुमारे ७ कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. अंत्योदय योजनेतील लाभार्थी तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी गटातील लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे.

लॉकडाऊनमुळे अनेक नागरीकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो‌ त्यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली होती आज ती मागणी मान्य झाल्यामुळे केंद्र सरकार आणि या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे खा. शरद पवार यांचे भुजबळ यांनी विशेष आभार मानले.

Previous articleनायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनात जिल्हात प्रथम.
Next articleशिक्षकांचे कार्य कौतुकास्पद: राजेंद्र अहिरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.