Home कोल्हापूर कोल्हापूरात सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या सराफ व्यावसायिकाचा राधानगरी धरणात बुडून मृत्यू...

कोल्हापूरात सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या सराफ व्यावसायिकाचा राधानगरी धरणात बुडून मृत्यू 🛑

127
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कोल्हापूरात सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या सराफ व्यावसायिकाचा राधानगरी धरणात बुडून मृत्यू 🛑
✍️ कोल्हापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

कोल्हापूर –⭕ राधानगरी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून एका सराफ व्यावसायिकाचा मृत्यू झाला. विवेक कमलाकर नागवेकर (वय -45, रा, एव्हरग्रीन होम, नागाळा पार्क, कोल्हापूर) असे या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती की, रंगपंचमी व गुडफ्रायडेची सुट्टी असल्याने कोल्हापूर येथील सागर घाटगे, आशिष पाटील, अखिल नागारजी, मनाल जाधव, महेश खालीपे व मयत विवेक नागवेकर हे सात जण राऊतवाडी धबधब्या जवळ असलेल्या क्षितिज होम स्टे येथे सकाळी 11 वाजता जेवणासाठी आले होते. दुपारी जेवण करून त्यातील तिघेजण चार वाजता पोहण्यासाठी धरणातील पाण्यात उतरले. विवेक नागवेकर हे पाण्यात खोलवर गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने विवेक यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा करून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रात्रभर शोधकार्य सुरु होते.
आज सकाळी 7 वाजता विवेकचा मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह बाहेर काढून सोळाकुर येथे तपासणी व शव विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकाकडे ताब्यात देण्यात आला.

अधिक तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डूबल यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णात यादव, के डी लोकरे, प्रविण गुरव हे करीत आहेत.⭕

Previous articleनव्या गृहमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी दिलं आश्वासन – प्रशासकीय कामात राजकिय हास्तक्षेप करणार नाही राजेश एन भांगे
Next articleरामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here