• Home
  • रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

राजेंद्र पाटील राऊत

20210406_164111.jpg

रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
कोरोना covid-19 या महामारीने गतवर्षीपासून सर्वत्र हाहाकार माजवला आहे. गरजू साठी मदतीचा हात या उपक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी श्री रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी मुखेड कंधार विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामदास पाटील सुमठानकर मित्र परिवाराच्या वतीने देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोना covid-19 ने थैमान घातले असून त्याचा फटका रक्तसंकलनावर पडला आहे. रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रामदास पाटील सुमठानकर मित्र परिवाराच्या सहकाऱ्यांनी दिनांक 12 एप्रिल रोजी रामदास पाटील सुमठानकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज, राजे संभाजी चौक जाहूर, बस स्टॅन्ड चौक मुक्रामाबाद, विद्या विकास विद्यालय बाराहाळी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर मुखेड, लोकनेते माजी नगराध्यक्ष कै. मष्णाजी नीलमवार साहेब सभाग्रह गोकुळ नगर देगलूर अशा सहा ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपापल्या भागातील नागरिकांनी ,तरुणांनी आपापल्या भागात रक्तदान करून या सामाजिक राष्ट्रीय कार्यात सहभाग घेऊन आपले रक्तदान करावे व राज्यात भासत असलेल्या रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून सहकार्य करावे .कोरोनाच्या कठीण काळात सिझेरियन व डायलेसिस च्या रुग्णांना रक्ताची अडचण भासत आहे. नांदेड शहरातील शासकीय व खाजगी रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा भासत असल्याने जास्तीत जास्त नवतरूण रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन रामदास पाटील सुमठानकर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

anews Banner

Leave A Comment