• Home
  • पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जमावबंदी! एक हजार रुपयाचा दंड ! शहराप्रमाणेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी! आठवडे बाजार देखील बंद..

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जमावबंदी! एक हजार रुपयाचा दंड ! शहराप्रमाणेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी! आठवडे बाजार देखील बंद..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210406-WA0055.jpg

🛑 पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही जमावबंदी! एक हजार रुपयाचा दंड ! शहराप्रमाणेच सायंकाळी सहा ते सकाळी सहापर्यंत संचारबंदी! आठवडे बाजार देखील बंद….! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

पुणे :⭕पुणे शहरा पाठोपाठ जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केली असून, आजपासून 9 एप्रिल पर्यंत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील दिवसा जमावबंदी, तर संध्याकाळी संचारबंदी लागू राहणार आहे.

या आदेशाचा भंग करणाऱ्यांना 1 हजार रुपयांचा दंड केला जाणार असून, जिल्ह्यातील सर्व गावातील आठवडी बाजार शासनाने रद्द केले आहेत.जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर पुणे शहरात लागू केलेल्या सर्व उपाययोजना पुणे जिल्ह्यातही लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीन एप्रिल पासून 9 एप्रिल पर्यंत हा आदेश लागू होत असून सकाळी सहा ते सायंकाळी सहापर्यंत पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

संध्याकाळी सहा ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा अशा बारा तासाच्या वेळेत पूर्णतः रस्त्यावर आणि गावांमध्ये जमावबंदी व संचारबंदी राहील. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती नगरपालिका नगरपरिषद हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल, सिनेमा हॉल, नाट्यगृह, व्यायाम शाळा पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.

मात्र हॉटेलमधून पार्सल सेवा पुरवता येईल.त्याचबरोबर तीन एप्रिल पासून पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नगरपरिषदांच्या हद्दीतील आठवडी बाजार बंद करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सभा-संमेलने, उद्घाटन, भूमिपूजन अशा, ज्या ठिकाणी अधिक लोक एकत्र येऊ शकतात ते सर्व कार्यक्रम बंद राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील, मात्र ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार आहे.

सर्व नागरिकांनी सार्वजनिक तसेच कामाच्या ठिकाणी अथवा खाजगी वाहनातून प्रवास करताना देखील मास्क वापरणे बंधनकारक राहणार आहे. येत्या नऊ एप्रिल पर्यंत ही उपाय योजना लागू राहणार आहे.⭕

anews Banner

Leave A Comment