• Home
  • शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस 🛑

शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210401-WA0070.jpg

🛑 शरद पवारांवर शस्त्रक्रिया; राणे कुटुंबीयांनी रुग्णालयात जाऊन केली विचारपूस 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई –⭕ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मंगळवारी पोटदुखीचा जास्त त्रास झाल्यामुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर आजच शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वी झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दिग्गजांकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.

अशातच भाजप नेते नारायण राणे यांनी रुग्णालयात पवारांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली आहे.

खासदार नारायण राणे, त्यांच्या पत्नी नीलम राणे आणि सुपुत्र नितेश राणे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवारांच्या प्रकृती विचारपूस केली आहे. नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना राणे आणि पवार यांच्यात वारंवार बैठका होत होत्या. त्यामुळे नारायण राणे आणि शरद पवार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत.

दरम्यान, शरद पवार यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डॉक्टरांच्या टीमचे आभारही मानले. तर, राज्याचे आरोग्य मंत्री यांनी शरद पवार यांच्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती माध्यमांशी संवाद साधाताना दिली.

येत्या काही दिवसांमध्ये त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे, ज्याबाबतचा निर्णय डॉक्टर घेतील. पण, तूर्तास मात्र शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.⭕

anews Banner

Leave A Comment