Home कोल्हापूर दत्त सहकारी साखर कारखान्याच्या याचिकेचा उच्च न्यायालयात आज सुनावनी

दत्त सहकारी साखर कारखान्याच्या याचिकेचा उच्च न्यायालयात आज सुनावनी

174

राजेंद्र पाटील राऊत

दत्त सहकारी साखर कारखान्याच्या याचिकेचा उच्च न्यायालयात आज सुनावनी

(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
कोल्हापूर : शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या विशेष सर्व साधरण सभेला कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दि. ५ मार्च रोजी परवानगी दिली. मात्र या सभेलाच आक्षेप घेत संस्थेचे सभासद दस्तगिर बाणदार यांच्यावतीने अँड. धैर्यशील सुतार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संस्थेचे सुमारे ३२ हजार सभासद एकत्र जमा झाले तर कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढेल. तसेच जर ऑनलाईन सभा घेण्याचा घाट घातला तर या कारखान्यांचे बरेच सभासद हे ग्रामीण भागातील शेतकरी असून यांच्याकडे इंटरनेट तसेच मोबाईल सुविधा नाहीत.
कोरोनामुळे जिल्ह्यात तसेच स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारे जमाव जमा करण्यास मनाई केली असतानाही जिल्हाधिकारी देसाई यांनी या सभेला ही परवानगी कशी दिली असा सवाल याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच दत्त सहकारी साखर कारखाना हा बहुराज्यस्तरीय सहकारी संस्था या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत असल्याने राज्य सरकारचे आदेश या संस्थेला लागू होत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी देसाई यांना परवानगी देण्याचा अधिकारच नाही. असा दावाही याचिकेतून करण्यात आलेला आहे.
या सर्वसाधारण सभेत मूलभूत धोरणात्मक निर्णय घेण्याचा घाट घालण्यात येणार असल्याने सभा घेण्यास मनाई करावी, अशी विनंती याचिकेतून कऱण्यात आलेली आहे. सदर याचिकेवर न्यायमुर्ती आर. डी. धनूका आणि न्यायमुर्ती व्ही. जी. बीस्ट यांच्या खंडपीठासमोर आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता तातडीने सुनावणी पार पडणार आहे .

Previous articleचुकल का? बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांचा थेट प्रभागात फ्लेक्स लावून भाजपला घरचा आहेर?
Next articleजिल्हा परिषद नांदेड अध्यक्षा माननीय सौ. मंगाराणी सुरेशराव अंबुलगेकर यांनी घेतली कोरोना लस..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.