Home मुंबई प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार अर्थसंकल्प 🛑

प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार अर्थसंकल्प 🛑

188
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार अर्थसंकल्प 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. ना. अजितदादा पवार साहेब यांनी विधान भवनात मांडला. कोरोना मुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती, केंद्र सरकारने थकवलेला जीएसटी या कारणामुळे राज्याच्या तिजोरीत प्रचंड आर्थिक अडचण असतांना देखील महाविकास आघाडी सरकारने शेतकरी, कष्टकरी व सामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्प सादर केला.

आजच्या अर्थसंकल्पातील काही ठळक तरतुदी व घोषणा :

– तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिलं जाणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. एपीएमसीच्या बळकटीकरणासाठी २ हजार कोटींच्या योजनेची घोषणाही ना. पवार साहेब यांनी केली. कृषी पंपाच्या सौरऊर्जा जोडणीसाठी १,५०० कोटींचा महावितरणला निधी दिला जाणार. तसेच विकेल ते पिकेल योजनेला २१०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

– करोनामुळे आरोग्य सेवा सुधारण्याची गरज आहे. आरोग्यसेवेसाठी 7 हजार कोटींचा प्रकल्प प्रस्तावित असून, करोनामुळे आरोग्य सेवा सुधारीत करण्याची गरज आहे. जिल्हा रुग्णालये, मनपा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार येणार. मनपा, नगर परिषदा, नगरपंचायतीत सरकार आरोग्य पायाभूत सुविधा उभारणार. मनपा क्षेत्रांसाठी ५ वर्षात ५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, यंदा ८०० कोटी देणार असल्याची घोषणा ना. पवार साहेब यांनी केली.

– राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा.
स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असं म्हणत अजित पवारांनी एक घोषणा केली. नवीन घरं विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार. पण, घर महिलेचा नावावर असलं पाहिजे.

– एसटी महामंडळाला १ हजार ४०० कोटींचा निधी
राज्याच्या ग्रामीण भागात १० हजार किमी रस्त्यांची कामे आगामी काळात करण्यात येतील. त्याचबरोबर पुणे-नाशिक जलद रेल्वे मार्गाच्या कामाला राज्य सरकारची मंजुरी देण्यात आली आहे. पुणे-नाशिक मार्गावर २४ प्रकल्प उभारणार. परिवहन मंडळाला १ हजार ४०० कोटी निधी देण्यात येणार आहे.

– सिंचनासाठी मोठी तरतूद
राज्याच्या सहकार व पणन विभागासाठी १२८४ कोटी रुपये देण्यात येणार. त्याबरोबर जलसंपदा विभागाच्या २७८ कोटींच्या प्रकल्पांचे काम सुरु आहे. राज्यात २७८ सिंचन प्रकल्पांचे काम सुरु आहे. दुसरीकडे प्रधानमंत्री सिंचन योजनेतंर्गत २६ प्रकल्पांना २१६९८ कोटी रुपये देणार. महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटी मंजूर करण्यात आले आहे. डिसेंबर २३ अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून, १२ धरणांच्या बळकटीसाठी 624 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

– सारथी व बार्टी या दोन्ही संस्थांना प्रत्येकी १५० कोटी रुपये…

– इतर मागास कल्याण विभागासाठी ३२१० कोटी रुपये…

– महिला व बालविकास विभागासाठी २२४७ कोटी रुपये…

– अल्पसंख्यांक विभागास ५९० कोटी रुपये …

– आदिवासी विकास विभागासाठी 9738 कोटींची तरतूद…

– श्री क्षेत्र नारायनगड, श्री क्षेत्र भगवानगड आणि श्री क्षेत्र गहिनीनाथ गडांच्या विकासाठी आवश्यक निधी दिल्या जाणर.

– स्व. गोपीनाथ मुंडे महामंडळाला कारखान्यांइतका निधी देणार आणि गोपीनाथ मुंडे विकास महामंडळासाठी कारखान्यांकडून प्रतिटन 10 रु. घेतले जाणार.⭕

Previous articleमुंबईत लवकरच अशंतः लॉकडाउन लागू शकतो; पालकमंत्र्यांनी दिले संकेत 🛑
Next articleअर्थमंत्री अजितदाद पवार यांनी मांडला वस्तुनिष्ठ व प्रामाणिक अर्थसंकल्प ; सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here