• Home
  • पट्टणकोडोली मध्ये तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

पट्टणकोडोली मध्ये तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

कोल्हापूर : पट्टणकोडोली ता.हातकणंगले येथील एका तरूणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संतोष रंगराव माने हा मूळचा बहादूरवाडी येथील असून लहानपणापासूनच तो शिक्षणासाठी पट्टणकोडोली येथे मामा रामचंद्र अवघडी रामाण्णा यांच्याकडे राहण्यास होता. संतोष याने शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरी कोणी नसल्याचे पाहून राहत्या घराच्या तुळीस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांना आढळून येताच त्यांनी हुपरी पोलिसात या घटनेची माहिती दिली. हुपरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी येथे पाठविला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची वर्दी मामा रामचंद्र रामाण्णा यांनी पोलिसात दिली असून घटनेचा अधिक तपास हुपरी पोलिस ठाण्याचे हवालदार सावरतकर करीत आहेत.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment