Home माझं गाव माझं गा-हाणं शिवनेरी विधायक मित्रमंडळ व दैवत प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीने संपूर्ण दिवसभर सोशल डिस्टेटिंग...

शिवनेरी विधायक मित्रमंडळ व दैवत प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीने संपूर्ण दिवसभर सोशल डिस्टेटिंग नियमांचे अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने पालन करुन अत्यंत साध्या पध्दतीने परंतु खुप मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्याचा खरोखरच अनोखा आनंद!

249

राजेंद्र पाटील राऊत

शिवनेरी विधायक मित्रमंडळ व दैवत प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीने संपूर्ण दिवसभर सोशल डिस्टेटिंग नियमांचे अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने पालन करुन अत्यंत साध्या पध्दतीने परंतु खुप मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केल्याचा खरोखरच अनोखा आनंद

सिनियर रिपोर्टर सुभाष कचवे युवा मराठा न्युज नेटवर्क (चँनल)
मालेगांव तालुक्यातील सोयगाव दाभाडी शिवरोड लगत दौलती इग्लिश मेडियम स्कुल जवळील शिवनेरी चौकात दि.19/2/2021 वार शुक्रवारी सकाळी ठिक नऊ वाजे पासुन ते सांयकाळी ठिक सात वाजे पर्यंत छत्रपती शिवजयंती साजरा करत असतांना प्रशासनाने दिलेल्या सोशल डिस्टेटिंगच्या नियमाचे उल्लंघन होऊ नये म्हणून शिवनेरी विधायक मित्रमंडळ व दैवत प्रतिष्ठान मित्रमंडळातील जबाबदार पदाधिकारी म्हणून सर्वश्री सुभाष निकम,प्रशांत सूर्यवंशी,चंद्रकांत माऊली,किशोर शिंदे, जितु भामरे,अर्जुन पवार,अनिल आप्पा,काकाजी शेवाळे,मोरे बापु,अशोक पाटील,संदिप पाटील,कर्नल पाटिल,मेजर भामरे,शेखर जाधव,नरेंद्र अहिरे,राहुल मेडिकल,राहुल बोरसे,मधुकर भदाणे,पप्पु निकम,सुनिल वाघ,तसेच शिवजयंती उत्सव कमेटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवि निकम,उपाध्यक्ष भुषण बच्छाव खजिनदार राहुल पवार व जनरल सेक्रेटरी विकी कापडणीस असे मोजकेच पदाधिकारी यांचेवर दोघंही मडळाच्या वतीने पुर्णपणे जबाबदारी देऊन या पदाधिकाऱ्यांनी देखील जबाबदारीचे भान ठेवून सोशल डिस्टेटिंग नियमांचे अतिशय काटेकोर पालन करतांना सकाळी ठिक दहा वाजता दाभाडी येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीमान भिका आण्णा साहेब यांचे लहान बंधू व शिवनेरी क्रुषी सेवा केंद्राचे मुख्य संचालक श्रीमान संजय बाबुराव निकम यांचे शुभहस्ते स्वपत्नी सह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन शिव जयंती साजरा करायला सुरुवात करुन देतांना अतिशय साध्या पध्दतीने का होईना परंतु मालेगांव शहरातील विविध क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाला दिलेल्या भेटी बरोबरच परिसरातील सर्व शिवप्रेमी भक्तांना देखील छत्रपती शिवजयंतीचा खरोखर आनंद घेता यावा म्हणून मंडळाने नेमुन दिलेल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी खूप मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरा करतांना प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याची जी काही काळजी घेऊन दिवसभरासाठी जे नियोजन केले होते तेव्हा ते नियोजन बघुन कार्यक्रमाला भेट देण्यासाठी मालेगांव शहरातून आलेल्या सर्व मान्यवर नेते गण यांचे बरोबरच परिसरातील सर्व शिवभक्त प्रेमी नागरिकांनी देखील शिवनेरी विधायक मित्रमंडळा बरोबरच दैवत प्रतिष्ठान मित्रमंडळाचे सुध्दा अगदी तोंड भरून कौतुक करतांना खुप मोठे समाधान वाटल्याचे दिवसभरातुन अतिशय आदर्श व सौजन्य पुर्ण वातावरणावरुन दिसुन येत होते.

Previous articleदहिदी गावाचा सर्वागींण विकास घडवून दाखवणार
Next articleउस्मानाबाद चे जिल्हाधिकरी लस घेऊनही झाले कोव्हीड संसर्ग
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.