Home माझं गाव माझं गा-हाणं समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत कु. ऋतुजा हिरेचे यश         

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत कु. ऋतुजा हिरेचे यश         

178

राजेंद्र पाटील राऊत

समृद्धी प्रज्ञाशोध परीक्षेत कु. ऋतुजा हिरेचे यश                                                                       निमगांव,(विशाल हिरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
टी. के. आर. एच. विद्यालयातील इ. १० वी (अ) ची विद्यार्थिनी कु. ऋतुजा हिरे हिने राज्यस्तरीय समृद्धी प्रज्ञाशोध ऑनलाइन परीक्षेत सहभाग नोंदवून घवघवीत यश प्राप्त केले.राज्यातील ५००० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.त्यापैकी ऋतुजा हिरेचा ८ वा क्रमांक आला. तिने या परीक्षेत १०० पैकी १०० गुण प्राप्त केले.या स्पर्धेत राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न विचारण्यात आले होते.समृध्दी प्रज्ञा शोध विभागाकडून रोख स्वरूपात एक हजार रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. तिच्या या यशाबद्दल महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सरचिटणीस आदरणीय डॉ.श्री.प्रशांत दादा हिरे,संस्थेचे समन्वयक मा.डॉ.श्री.अपूर्वभाऊ हिरे, युवानेते मा.श्री.अद्वयआबा हिरे, संस्थेचे विश्वस्त डॉ.श्री.सुभाष निकम यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.
कु. ऋतुजा हिरे हिला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.आर.जे.निकम, उपमुख्याध्यापक श्री. आर.जी.पाटील, पर्यवेक्षक श्री.जी.ए.शेवाळे तसेच विद्यालयातील सर्व विज्ञान शिक्षक यांनी मार्गदर्शन केले. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालक वर्गाकडून तिचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Previous articleमुखेडात शिवजन्मोत्सव निमित्त व्याख्यान, व रक्तदान शिबीर, उत्साहात संपन्न..
Next articleभारतीय मराठा संघ, मुंबई प्रदेश तर्फे शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.