Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणे कौळाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी….तर आता अन्नत्याग आंदोलन!

व-हाणे कौळाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी….तर आता अन्नत्याग आंदोलन!

210

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणे कौळाणे पत्रकार भवन जागाप्रश्नी….तर आता अन्नत्याग आंदोलन!
मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- गेल्या सहा महिन्यापासून अधिक कालावधी लोटला गेला तरी पत्रकार भवनच्या जागेप्रश्नी कुठलाही ठोस निर्णय घेतला जात नसल्यामुळे आता लवकरच नाशिकच्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यत अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा भारतीय मराठा महासंघाचे उतर महाराष्ट्र अध्यक्ष तथा युवा मराठा न्युज चँनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.
मालेगांव तालुक्यातील कौळाणे (नि.) व व-हाणे येथील पत्रकार भवनच्या जागेसाठीचा प्रश्न गेल्या सहा महिन्यापेक्षा अधिकच्या काळापासून प्रशासनाच्या व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणिमुळे रेंगाळत पडला आहे.प्रत्यक्षात शासनाचे परिपत्रक जी.आर असतानाही मुद्दामच कागदी घोडे नाचविण्याच्या नादात मालेगांव तालुका पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांकडून वेळकाढू धोरण राबविले जात आहे.
प्रत्यक्षात वरील गावामध्ये ज्या लोकांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केलेत,त्यांची पाठराखण या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे,तर नियमानुसार पत्रकार भवनला मागितलेली वरील गावातील जागा देण्यास अधिकारी दुटप्पी भुमिका पार पाडत आहेत.त्यामुळे आता जोपर्यंत पत्रकार भवनला जागा दिली जात नाही व त्याबाबत ठोस कारवाई होत नाही,तोपर्यंत नाशिक येथे जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन लवकरच पुकारले जाईल असा इशारा राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.

Previous articleआदरणीय कै.विठ्ठलराव केशवराव पाटील यांचे निधन..
Next articleपंचायत राज समिती च्या भेटीदरम्यान स्फोटाचे वृत्त केवळ अफवा…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.