Home नांदेड मुखेड तालुक्यातील राजुरा (बु.) येथील तुकाराम पाटील इंगळे यांचा आमदार डॉ. तुषारजी...

मुखेड तालुक्यातील राजुरा (बु.) येथील तुकाराम पाटील इंगळे यांचा आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या उपस्थितीत भाजपात भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश..

114
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील राजुरा (बु.) येथील तुकाराम पाटील इंगळे यांचा आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या उपस्थितीत भाजपात भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा बु. येथील तुकाराम पाटील इंगळे यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मुखेड शहरातील भा. ज.पा. चे कार्य सम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयात राजुरा बु.येथील तुकाराम पाटील इंगळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपात प्रवेश करण्यात आला. यावेळी ता. अध्यक्ष डॉ.वीरभद्र हिमगिरे जिल्हा सरचिटणीस डॉ.माधव पाटील उच्चेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. तुषारजी राठोड यांचे हस्ते दस्ती व पुष्पहार टाकून त्यांचे भाजपात स्वागत करून सत्कार करण्यात आला. यावेळी विलास पाटील राजूरकर यांच्यासह तुकाराम पाटील इंगळे यांचे समर्थक व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here