राजेंद्र पाटील राऊत
युवा मराठा न्युजचे मराठवाडा विभागीय संपादक
बालाजी पाटील यांचे आज नांदेडात आगमन !
मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क))-युवा मराठा न्युज महाराष्ट्र या लोकप्रिय आँनलाईन वेब न्युज चँनलचे नवनियुक्त मराठवाडा विभागीय संपादक बालाजी ज्ञानोबा पाटील यांचे आज नांदेड जिल्ह्यात आगमन होत असून,त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंंदन होत आहे.
युवा मराठा न्युज चँनलच्या स्थापनेपासून नांदेड जिल्हा ब्युरो चीफ म्हणून काम पाहणारे बालाजी पाटील यांनी आपल्या कर्तबगारीवर नांदेड जिल्ह्यात युवा मराठाचे नेटवर्क वाढविण्यासाठी अविरत परिश्रम घेतल्याने,त्यांची नुकतीच मुंबई येथे पार पडलेल्या युवा मराठा न्युजच्या खास बैठकीत मराठवाडा विभागीय संपादक पदावर वर्णी लावण्यात आली असून मराठवाडयातल्या प्रत्येक जिल्ह्यात युवा मराठाचे नेटवर्क वाढविण्याची जबाबदारी त्यांचेवर सोपविण्यात आली आहे.
बालाजी पाटील यांच्या या निवडीचे प्रा.मारोती गायकवाड सर,माजी आमदार डाँ.डि.आर देशमुख नांदेड,प्रिंन्सीपल गजभारे पापासर मुखेड,प्रा.रमेश गायकवाड ,चिंगळे किशन सर,अतुल मेडीकल मुक्रामाबाद,बाळासाहेब इंगळे पाटील परभणी,शंकरराव पाटील निवळे,उमेश पाटील गोजेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस मुखेड,रविंद्र खोमणे पाटील युवा मराठा न्युज औरंगाबाद ,बळीराम पाटील मुखेड स्वस्त धान्य दुकान संघटना युवा मराठा फाउंडेशन आदिनी अभिनंदन केले असून भावी वाटचालीस बालाजी पाटील यांना शुभकामना बहाल केल्या आहेत.




