राजेंद्र पाटील राऊत
मुखेड तालुक्यातील 73728 शेतकऱ्यांना मिळणार 23 कोटी 44 लाख रुपये अतिवृष्टीचे अनुदान..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील 73728 शेतकऱ्यांना 23 कोटी 44 लाख रुपये अतिवृष्टीचे अनुदान मिळणार असून माहे जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे झालेल्या शेती पिकांचे नुकसान तसेच फळ पिकाचे झालेले नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना पहिला टप्पा यापूर्वीच देण्यात आला आहे तर दुसरा टप्प्याचे अनुदान 23 कोटी 44 लाख 41 हजार 300 रुपये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत अशी माहिती मुखेड चे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांनी आज दिनांक 24 जानेवारी 2021 रोजी दिली आहे. मुखेड तालुक्यातील 134 गावातील 73728 शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. यात जिरायती बागायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10000 रुपये तर बहुवार्षिक फळ पिकांना हेक्टरी 25,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. या कामासाठी तहसीलदार श्री काशिनाथ पाटील सर नायब तहसीलदार श्री महेश हांडे सर पेशकार गुलाब शेख व महसूल सहाय्यक नरेश धनशेट्टी आदींनी कार्यालयीन कामकाजात परिश्रम घेतले.