• Home
  • खेड तालुक्यातील आंबये गावचे विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती 🛑

खेड तालुक्यातील आंबये गावचे विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210120-WA0010.jpg

🛑 खेड तालुक्यातील आंबये गावचे विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )

खेड:⭕ मुंबई शहर कबड्डी असो.चे प्रमुख कार्यवाह व अ.भा. कबड्डी महासंघाच्या पंच समितीचे सचिव आणि प्रो कबड्डी रेफरी इंचार्ज विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्या कार्यकारणी समितीत “निमंत्रित सदस्य” म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या आदेशाने झालेल्या या सदस्य नियुक्तीचा कार्यकाळ हा अस्तित्वात असलेल्या राज्य कार्यकारीणीचा कार्यकाळ संपेपर्यंत म्हणजे २०२३ पर्यंत असेल.

मोरे यांच्या नियुक्तीबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले की मुंबईतील कबड्डी खेळ व खेळाडू यांच्या समस्यां राज्य संघटनेच्या सहकार्याने सोडविण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहीन. त्यांच्या या नियुक्तीबद्दल कबड्डी परिवार व मित्रमंडळीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.⭕

anews Banner

Leave A Comment