
राजेंद्र पाटील राऊत
बहुजन ग्राम विकास आघाडी उंद्री(प.दे.) पॅनल ने आद्य देवतेच्या चरणी नारळ फोडून प्रचारास दणदणीत सुरुवात…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
काल दिनांक 9 जानेवारी 2021 रोजी उंद्री (प.दे) ग्रामपंचायत निवडणूक 2020-21 निमीत्ताने बहुजन ग्रामविकास आघाडी पँनलच्या वतीने काल गावातील सर्व आद्य दैवतांच्या चरणी नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी स्व.लक्ष्मीबाई उर्फ साखरबाई माधवराव पा.वडजे यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच या दु:खद घटनेमुळे पँनल प्रमुख माधवराव पाटील उंद्रीकर यांच्यावर बंधने आली असल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी स्वतःला उमेदवार समजून मेहनत घेऊन गावातील बहुजन ग्रामविकास आघाडीच्या तीन प्रभागातील 9 उमेदवारांना निवडून आणण्यासाठी वचनबद्ध असल्याचे जाहीर केले.
या प्रचाराच्या शुभारंभी गावातील युवा ,ज्येष्ठ ,सर्वसामान्य ,गोरगरिब तरूण,नागरिक उपस्थित होते.