राजेंद्र पाटील राऊत
देगलूर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ न काढल्यास भाजप यू.मोर्चा ने दिला आंदोलनाचा इशारा
नांदेड, दि.३१ – राजेश एन भांगे
देगलूर येथे मगच्या कार्यकाळात शहरातील मुख्य बाजार पेठेतील वाढलेली अतिक्रमण साफ करून तेथे चकाचक प्लेवर ब्लॉक व सी. सी रोड बनवून शहर वासियांना एक मोकळा श्वास देण्याचे काम केले होते.
परंतु हल्ली त्याच मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण वाढले असून त्यामुळे इतर वाहन धारक व पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण होत असून ही बाब लक्षात घेता हे अतिक्रमण तत्काळ काढून अतिक्रमण धरकांवर कार्यवाही करण्या संदर्भात भाजप युवा मोर्चा तर्फे कार्यकारी अभियंता व नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांना निवेदन देण्यात आले व तसेच झालेले अतिक्रमण लवकरात लवकर न काढल्यास भाजप युवा मोर्चा तर्फे आंदोलन करण्यात येईल व याची सरस्वी जबाबदारी नगर परिषदेची राहील असा इशाराही यावेळी मुख्यधिकरी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
तरी यावेळी आत्माराम पाटील, चिलवरवार बी.आर,गंगाधर दाउलवार ,दिगंबर कौरवार,सतीश जोशी,मनोज शिंगारे, सुरज मामीडवार, राहुल पेंडकर, भाजयुमो अशोक कांबळे, योगेश रौलवर, सौरभ मधुरवार,अर्जुन वणप्रतिवार ,अमर पब्बावार , सचिन कांबळे,संतोष मरतुळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




