राजेंद्र पाटील राऊत
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने शिरोलीत सभा
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील शिरीली येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती , केंद्रातील सरकार खरचं शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत असेल तर त्यांनी शेतकरी विरोधी नवीन तीनही कृषी कायदे मागे घेतले पाहिजे अशी मागणी हातकणंगले विधानसभेचे आमदार मा.राजूबाबा आवळे यांनी केली.
दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरोली येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी. खासदार राजू शेट्टी साहेब यांनी यावेळी मार्गदर्शन केले आणि या कायद्यातील त्रुटी व तोटे त्यांनी स्पष्ट करून शेतकऱ्यांना समजावून सांगितलं तसेच
यावेळी गिरीश फोंडे, जनार्दन पाटील, सुरेश यादव, वैभव कांबळे, महेश चव्हाण, बाजीराव सातपुते, आदी शिरोली गावातील मान्यवर उपस्थित होते.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .