राजेंद्र पाटील राऊत
नांदेड येथे केंद्रातील नवीन कृषी कायद्याच्या विरोधात डावी लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निर्दशने करण्यात आली.
नांदेड, दि.८ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क
दिल्ली येथील शेतकरी आंदोलन समर्थनात व केंद्रातील भाजप सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या विरोधात डावी लोकशाही आघाडी व समविचारी पक्ष संघटनाच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यलया समोर बैठे सत्याग्रह व तीव्र निदर्शने करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड) चे प्रतिनिधीत्व करताना भारतीय कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड) चे महाराष्ट्र प्रदेशाउपद्यक्ष कॉ.प्रा.इरवंत रा.सुर्यकर, मराठवाडा प्रवक्ता, कॉम्रेड संतोष शिंदे, मराठवाडा संघटक कॉम्रेड अनतेश्वरा ताई बंदुके, नांदेड जिल्हादयक्ष कॉम्रेड अंबादास भंडारे, नांदेड जिल्हाप्रवक्ता कॉम्रेड नजीर शेख, भारतीय स्टुडंट्स फेडरेशन चे मराठवाडा प्रदेशयादयक्ष कॉम्रेड दिलीप कंधारे, नांदेड जिल्हादयक्ष कॉम्रेड गोपाळ वाघमारे व आदी कॉम्रेड कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून केंद्र सरकारच्या नवीन शेतकरी कायद्याच्या विरोधात निदर्शने केली.