राजेंद्र पाटील राऊत
भाजप सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत यासाठी जाहुर येथेप्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने कडकडीत बंद..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
जाहूर ता. मुखेड येथे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ आज कडकडीत बंद पाळण्यात आला सरकारने लादलेला कृषी विरोधी काळा कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी प्रहार पक्षाच्या वतीने जाहूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी जाहूरयेथील प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका सचिव गोपाळ पाटील हिवराळे व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष शंकर बोडके उपाध्यक्ष शिवाजी मदने सचिव सोन्या पाटील व महादेव चिकटवाड संदीप पाटील भिंगोले वैभव हिवराळे आदित्य गव्हाणे ब्रह्मानंद महाराज बोडके आदीं कार्यकर्ते व गावातील असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.