Home महाराष्ट्र कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहारात संचारबंदी 🛑

कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहारात संचारबंदी 🛑

236

राजेंद्र पाटील राऊत

🛑 कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहारात संचारबंदी 🛑
✍️ पंढरपूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )

पंढरपूर:⭕रात्री १२.०० वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबरच्या रात्री १२.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जारी केले.
कार्तिक वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. वारी कालावधीत पंढरपुरात भाविकांची गर्दी होऊन कोरोनाचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने, संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने पंढरपूर शहरात आणि शहराच्या आजूबाजूला असलेल्या भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मीटाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव- शिरढोण, आणि कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ नुसार १४४ अंतर्गत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत.
आदेश खालील बाबींना लागू होणार नाहीत

अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरविणारी खाजगी/सरकारी रूग्णालये,आरोग्य सेवा देणारे डॉक्टर व वैद्यकीय सेवेशी संबंधित कर्मचारी आणि त्यांची वाहने.

ॲम्ब्युलन्स सेवा आणि सारी,आयएलआय आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसंदर्भात सर्वेक्षण करणारे अधिकारी/कर्मचारी.

जीवनाश्यक सेवेतील आस्थापना

मंदिर समिती पंढरपूर यांच्याकडील पासधारक अधिकारी/ कर्मचारी

कर्तव्यावर असणारे महसूल,पोलीस, पाणीपुरवठा, अग्निशमक, विद्युत पुरवठा विभागातील शासकीय अधिकारी/कर्मचारी.

पोलीस बंदोबस्तासाठी भोजनालय,पाणीपुरवठा सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणा.

कार्तिकवारी कालावधीमध्ये परंपरेनुसार साजरे होणारे उत्सव यांना स्थानिक परिस्थितीनुरुप परवानगी देण्याचे अधिकारी राखून ठेवण्यात येत आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती किंवा संस्था भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे….⭕

Previous article🛑 अजोय मेहता यांनी नरीमन पॉइंट येथे खरेदी केला ५.३ कोटींचा फ्लॅट 🛑
Next articleबीडचे माजी खासदार आणि भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.