राजेंद्र पाटील राऊत
1 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद राहणार जिल्हा प्रशासना कडून दिले आदेश..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
नांदेड आज दिनांक 24 डिसेंबर रोजी मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील आठवडी बाजार 1 डिसेंबर रोजी बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त. औरंगाबाद जिल्हा पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होत आहे या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा व तसेच मतदान शांततेत पार पडावा यादृष्टीने नांदेड जिल्ह्यातील कुंटूर ता. नायगाव येवती ता. मुखेड उमरी ता. उमरी बिलोली कुंडलवाडी वाई बाजार तालुका माहूर कवठा वाजेगाव नांदेड शहर महबूबनगर लक्ष्मी नगर नांदेड लोहा मारतळा कलंबर बुद्रुक तालुका लोहा येथील बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री विपिन ईटणकर यांनी दिले आहेत.