राजेंद्र पाटील राऊत
मौजे रावणकोळा ता. मुखेड रस्त्याच्या कामाची सुरुवात. राष्ट्रीय सामान्य विभागानेघेतली रयत क्रांती संघटनेच्या निवेदनाची दखल..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी मिळालेल्या माहितीनुसार मुक्रमाबाद उदगीर रावणकोळा या महामार्गावर खड्डे अतिशय जास्त प्रमाणात झाले होते त्यासाठी रयत क्रांती चे युवा जिल्हाध्यक्ष शिव शंकर पाटील कलंबर कर यांनी राष्ट्रीय सामान्य विभागास निवेदन दिले होते या मार्गावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने काम बंद करून याठिकाणी व्यवस्थितरीत्या काम करण्यात यावे चांगला रस्ता बनवण्यात यावा यासाठी सामान्य विभागास निवेदन देण्यात आले होते.या निवेदनाची दखल घेत राष्ट्रीय सामान्य विभागाने त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा रस्त्याचे काम चालू केले आहे.त्यामुळे ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना रहदारी करतात त्यांना त्रास होणार नाही याची दखल शासन दरबारी घेतली असून या निवेदनाची दखल प्रशासनाने घेतल्यामुळे शिवशंकर पाटील कलंबर कर यांनी आभार व्यक्त केले आहे.