राजेंद्र पाटील राऊत
तळेगांव येथे भाजप कार्यकर्त्यांनी केली विजबिलाची होळी
नांदेड, दि.२३ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क
कोरोना महामारी च्या काळात आलेल्या वाढीव वीज बिल निषेधार्थ आज तळेगाव येथे भारतीय जनता पार्टी तळेगाव शाखेच्या वतीने विज बिलाची होळी करण्यात आली. व महाआघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आले. आणि तात्काळ ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे विजबील माफ नाही केले तर यापुढे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आले. तरी यावेळी भाजपचे शाखाध्यक्ष दादाराव पाटील जाधव, दत्ता जाधव, व्यंकटेश मनोलवार, पांडुरंग जाधव, मारोती नाटकर, बालाजी शिगळे, आनंदा गणगोपलवाड, दत्ता नाटकर, साहेबराव नाटकर, साहेबराव जाधव, मोहन मेटेवाड,
परसराम नाटकर, गोविंद गणगोपलवाड आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.