राजेंद्र पाटील राऊत
*”मुखेडात गोरगरिबांना स्वस्त दरात पुरवले जाणारे अन्नधान्य कचराकुंडीत*”
*दूषित अन्नधान्य खाऊन गोरगरिबांचे आरोग्य धोक्यात.
*जिल्हापुरवठा विभाग मुग गिळून गप्प का ?
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क मुखेड शहरातील राशन पुरवठाचे गोदाम शहरातील लघुशंकेचे ठिकाण बनले आहे.या गोदामाच्या परिसरात व गोदामाच्या भितींवरच नागरिक लघुशंका करत आहेत.तर शहरातील अनेक आजुबाजूच्या दुकानातील सर्व केर कचरा आणून गोदामाच्या परिसरात टाकले जात आहे.तर रात्रीच्या वेळी अनेक तळीमार दारू पिऊन दारूचे बाटल्या टाकत आहेत.त्यामुळे मुखेड च्या राशन पुरवठा गोदामाला लघुशंका व कचराकुंडीचे स्वरूप आले आहे.त्यामुळे गोदामाच्या परिसरात सर्वत्र घाण पसरली आहे.त्यामुळे मोठी दुर्गंधी येत आहे.
मुखेड शहरातील राशन पुरवठाचे गोदाम हे अन्नधान्य पुरवठ्याचे गोदाम आहे.का शहरातील लघुशंका व कचरा कुंडीचे ठिकाण आहे.हेच कळत नाही.ज्या गोदामातून गोरगरिबांना स्वस्त दरात राशन दुकानाच्या माध्यमातून अन्नधान्य पुरवले जाते.ते अन्नधान्याच ठिकाण अशा प्रकारे गलिच्छ का ठेवले जाते,हेच कळत नाही.
गोदामाचा परिसर देखरेखे खाली रहावे. म्हणून कोणी वाचमॅन नेमले नाही.किंवा पुरवठा गोदामाल गेट बसवले नाही. त्यामुळे या पुरवठा विभागाच्या गोदामाला कोणी वाली आहे.का नाही हेच कळत नाही.त्यामुळे गोरगरिबांच्या जिवाची कोणालाही काळजी नाही.असे दिसुन येते.कारण आजपंर्यत या गोदामाचे परिसर कधी स्वच्छ केले नाही.किंवा या परिसरात कधी फवारणी केली जात नाही.त्यामुळे या ठिकाणचे जिव जंतू अन्नधान्यावर जाऊन बसतात त्यामुळे हे दूषित अन्नधान्य खाऊन गोरगरिबांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
मात्र याकडे मुखेड पुरवठा विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत.असल्यामुळे या गोदामाचा परिसर घाणीने पुर्ण भरुन जात आहे.त्यामुळे गोदामाचा बाहेरील परिसर असा आहे.तर आत्त मध्ये गोदाम कसे असेल याची पाहणी करण्याची गरज आहे.त्यामुळे नांदेड चे जिल्हा पुरवठा अधिकाय्रांनी मुखेड शहरातील या पुरवठा गोदामाची संपुर्ण पाहणी करावी.आणि गोदामाचे परिसर स्वच्छ ठेवण्याचे आदेश द्यावेत.अशी मागणी नागरिक करत आहेत.