राजेंद्र पाटील राऊत
जिल्ह्यातील शाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. शिक्षण सभापती माननीय संजय बेळगे सरांचे आवाहन मुखेड,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)– नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या 858 शाळा आहेत. सोमवार दिनांक 23 नोव्हेंबर 2020पासून या शाळा सुरू होत आहेत. शाळा सुरू करण्यापूर्वी योग्य ती खबरदारी घ्यावी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन माननीय शिक्षण सभापती संजय बेळगे सर यांनी केले आहे. Covid-19 त्या अनुषंगाने स्वच्छ हात धुऊन घेणे मास्क लावणे दोन व्यक्तीमधील सुरक्षित अंतर पाळणे शाळेचे निर्जंतुकीकरण आधी सर्व उपाययोजना करून आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले आहे. जिल्हा परिषद नांदेड शिक्षण समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा आज दुपारी शिक्षण समितीचे अध्यक्ष माननीय संजय बेळगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ते बोलत होते या सभेस समितीचे ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर लक्ष्मण ठक्करवाड साहेबराव धनगे संध्याताई धोंडगे अनुराधा पाटील यांनी ऑनलाइन सहभाग घेतला. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मा.प्रशांत दिग्रसकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी बी आर कुंडगीर यांनी शाळा सुरु होण्याआधी व सुरू झाल्यानंतर अवलंबिण्यात येणारी कार्यपद्धति याबाबत करावयाचे संपूर्ण नियोजन सभागृहास सादर केले. दि. 23 नोव्हेंबर रोजी शाळा सुरू होणार असल्यामुळे शाळांनी पूर्वतयारी करून घ्यावी हात धुण्यासाठी पाणी व साबनाची व्यवस्था शाळेची स्वच्छता निर्जंतुकीकरण करून घ्यावे सर्व गटशिक्षणाधिकारी यांनी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी शाळांना भेटी देऊन पाहणी करावी आणि 23 नोव्हेंबरला शाळा सुरू झाल्यानंतर शाळा व्यवस्थित सुरू होतील या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सभापतींनी सांगितले. आदर्श शाळा शाळा दुरुस्ती अनुदान शिक्षक निवडश्रेणी संचमान्यता बदल्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन शाळापूर्व तयारी व शाळा सुरू झाल्यानंतर करावयाची कार्यवाही आदी बाबीवर चर्चा करण्यात आली शिक्षण समिती सदस्यांसह उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर यांची यावेळी उपस्थिती होती