• Home
  • *गरबड गावात वाघ बारस सण साजरा*

*गरबड गावात वाघ बारस सण साजरा*

*गरबड गावात वाघ बारस सण साजरा*
(युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगाव :- तालुक्यातील गरबड या आदिवासी बहुल गावात दिवाळी सणाचा पहिला दिवस वसुबारस व नरक चतुर्दशीला आदीवासी परंपरा कायम राखत वाघ बारस सण साजरा करण्यात आला.या गावात आदिवासी कोळी महादेव व भिल बांधव मोठ्या संख्येने राहतात.त्यांचा प्रमुख देव वाघ देव असतो.त्याला वाघ्या असे ही म्हणतात.दिवाळीचा पहिला दिवस या दिवशी शेतातील,रानातील नवीन धान्य,भाजीपाला याची पुजा केली जाते. गरबड लुल्ले गाव वेशीवर असलेल्या वाघोबा देवाला गोड नैवेद्य खीर दिली जाते.गरबड गावातील गुराखी, मेंढपाळ, बकरके सर्वजण वाघ देवाला प्रार्थना करतात की, आमचे गुरे,शेळ्या, मेंढ्या व आमच्या जीविताचे रक्षण करावे.सर्वजण खिरीचा आस्वाद घेतात.यालाच खिरीची वाघ बारस म्हणतात.सायंकाळी विधिवत घरी, गोठयात गाय, वासरू यांची वसुबारस प्रथेप्रमाणे पुजा केली जाते. दुसऱ्या दिवशी बोरी नदीच्या तीरावर जमून वाघोबाला बोकड,कोंबडे,बोंबील याचा तिखट नैवेद्य दाखवला याला बोंबली वाघ बारस म्हणतात.यासाठी गावातून गुळ, तांदुळ,कोंबडे, बकरू व वर्गणी गोळा केली होती.गरबड गावातील लोक, गुराखी, मेंढपाळ,लहान मुले हे विधिवत पुजा, प्रार्थना करतात.पाच लहान मुलांना वाघ बनवतात.सर्वजन रानात,वेशीवर भोजन करतात.वाघ बारस ही परंपरा आदिवासी कोळी महादेव पुर्वापार पाळत आले आहेत.काळाच्या ओघात ही परंपरा कायम टिकून राहावी यासाठी गावातील आदिवासी विचार मंच,बिरसा ब्रिगेड संघटना पदाधिकारी रमेश जाधव,मधु गुमाडे,गोरख भांगरे,गोरख नाडेकर,वसंत भांगरे,
प्रयत्न करीत आहेत.

विष्णू गुमाडे,शंकर जाधव,शिवाजी सबगर,नामदेव जाधव,दादाजी बगाड,संजय भांगरे,तात्या सबगर,वाल्मिक नाडेकर, राहुल वेडेकर,बजरंग गुमाडे, गुलाब भांगरे,हरी नाडेकर,शिवाजी गुमाडे, लहू जाधव,नामदेव माळी, शांताराम दळवी,पांगु माळी, रोहिदास भांगरे,सुरेश गुमाडे,कृष्णा जाधव,यशवंत करवंदे,बारकू जाधव,काकाजी भांगरे,रंगनाथ गुमाडे,बबलू जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमात गरबड लुल्ले शिवारातील लोक मोठ्या संख्येने सहभागी होते.

anews Banner

Leave A Comment