Home Breaking News शेतकरी पुञाच्या आक्रमक लढ्याला आले मोठे यश ! शेतकऱ्यांना सरकारकडुन दिवाळी भेट…..!!

शेतकरी पुञाच्या आक्रमक लढ्याला आले मोठे यश ! शेतकऱ्यांना सरकारकडुन दिवाळी भेट…..!!

162
0

शेतकरी पुञाच्या आक्रमक लढ्याला आले मोठे यश ! शेतकऱ्यांना सरकारकडुन दिवाळी भेट…..!!
•••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••

मुखेड तालुक्यातील शेतकरी पुत्रानी तालुक्यात अतिवृष्टी पावसाने झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून
ओला दुष्काळ जाहिर करावा या मागणीसाठी तालुका प्रशासनासह राज्य शासनाला वेळोवेळी धारेवर धरत तालुक्यात मोर्चे,आंदोलने,घेरावो करून शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिले.
तालुक्यात पाहणी दोऱ्यावर आसलेल्या
मंत्र्याचे ताफे आडवुन शासनाला शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसानीचा मोबदला मिळवुन देण्यासाठी आक्रमपणे लढा दिला व शासनासनास शेतकरी बांधवांना अनुदान देण्यासाठी भाग पाडले त्याचे फळ म्हणजे शेतकऱ्यांना आज अतिवृष्टी नुकसानीचे अनुदानीची रक्कम मिळत आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे.असे मत तालुक्यातील शेतकरी बांधव व्यक्त करीत आसुन या लढवय्या त्रिमूर्ती शेतकरी पुत्राचे सर्वत्र अभिनंदन व्यक्त होत आहेत.

मुखेड तालुक्यातील शेतकरी बांधवांंना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बार्‍हाळी,चांडोळा,मुखेड,येवती,जाहुर,
अंबुलगा या सर्कलला हेक्टरी ६० टक्के प्रमाणे तर जांब सर्कल ला ५० टक्के तर सर्वाधिक लाभ मुक्रामाबाद सर्कलला ७० टक्के प्रमाणे शेतकर्‍यांना पुढीलप्रमाणे अनुदान मिळेल सरकारने हेक्टरी १० हजार रुपये मदत जाहीर केली.तर बार्‍हाळी,चांडोळा,मुखेड,येवती,जाहुर,
अंबुलगा या सर्कलला ६० टक्यानी ६००० रुपये हेक्टरी प्रमाणे लाभ मिळणार आहे.तर जाब सर्कलला ५० टक्के प्रमाणे ५००० रुपये हेक्टरी लाभ मिळणार आहे तर तालुक्यातील दोन साठवण तलाव फुटुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी शेतकरी पुञांनी रास्ता रोको आंदोलन केलेल्या मुक्रामाबाद सर्कलला तालुक्यात सर्वाधिक ७० टक्यांनी ७००० रुपये प्रमाणे लाभ मिळणार असल्याचे शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी प्रतिनिधीसी बोलताना सांगीतले यावेळी लढवय्ये शेतकरीपुत्र,बालाजी पाटील सांगवीकर,रमाकांत पाटील जाहुरकर,माधव पा.खदगावे,मन्मथ खंकरे,निळकंठ पाटील कोळनुरे उपस्थित होते.

•••••••••••••••••चौकट•••••••••••••••
तालुक्यातील शेतकरी मायबापा बांधवांना अतिवृष्टी नुकसानिचे अनुदान मिळावे यासाठी आक्रमकपणे लढा दिला म्हणुन आज तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत आहे. शेतकऱ्यांना नुकसानीचे अनुदान मिळवुन देण्यासाठी आम्ही प्रमाणीकपणे प्रयत्न केलो आहे.परंतु काही निष्क्रिय व कर्तव्य शुन्य लोकप्रतिनिधी आमची बदनामी करण्याचा प्रयत्न केले व शेतकरी पुत्राच्या या लढ्यास स्टंटबाजी करतात म्हणुन हिनविले परंतु आम्ही कुठल्याही टिकेला न डगमगता शेतकऱ्यांच्या हितासाठी जिवाचे रान करण्यासाठी कटीबद्ध आहोत.
– शेतकरीपुत्र बालाजी पाटील सांगविकर
••••••••••••••••चौकट•••••••••••••••

Previous articleकोरोनामुळे यावर्षीचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत
Next articleजुने पारगांव मधे वृक्षारोपनाचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here