मराठवाड्यातील पदवीधरांचे प्रतिनिधी मा सतिशभाऊ चव्हाण यांची प्रचार भेट: नादेंड राजेश भांगे युवा मराठा न्युज
कंधार शहरातील छत्रपती शंभुराजे इंग्लिश स्कूल कंधार या ज्ञानालयात पदवीधरांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी विद्यमान आमदार मा.सतिशजी चव्हाण यांनी श्री शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटी कंधारच्या सर्व पदवीधर प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर आणि कंधार पंचक्रोशीतील पदवीधर मतदारांशी संवाद साधुन आपल्या प्रचार दौरा मन्याड खोर्यातील पदवीधर मतदारसंघातील प्रचारचा आरंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात केली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधारचे सचिव माजी आ. मा.भाई गुरुनाथरावजी कुरुडे साहेब हे होते.
तर हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे साहेब मा जी प सदस्य नांदेड, व सर्व शिक्षक, शिक्षकेतर आदी च्या उपस्थिती पार पडला.