Home Breaking News *शेतकरी विरोधी कृषि विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे पाच...

*शेतकरी विरोधी कृषि विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे पाच हजार सह्याचे निवेदन सादर*…….

92
0

*शेतकरी विरोधी कृषि विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे पाच हजार सह्याचे निवेदन सादर*…….
जाहूर,(मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदा अमलात आणण्याचे धोरण राबवीत असुन तो कायदा लागू करण्यासाठी कुठल्याही घटक पक्षाची सोमवार शेतकरी संघटनेचे विचार विनिमाय न करताहुकूमशाही पद्धतीने विधेयक मंजूर केले त्या विधेयकामध्ये असे अनेक शेतकरीविरोधी धोरण असल्यामुळे फक्त मोठ्या उद्योजकांसाठी किंवा व्यापाऱ्यांसाठी हे कायदा लाभदायक असुन शेतकऱ्यावर अन्याय करणारा कायदा असल्यामुळे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने या कायद्याला विरोध करून हा कायदा रद्द करण्यासाठी सबंध भारत देशांमधून सह्याची मोहीम राबवून हा कायदा रद्द करण्यात यावा म्हणून राष्ट्रपती यांच्याकडे निवेदन सादर करणार आहेत म्हणून सबंध महाराष्ट्र मधून मुखेड विधानसभा मतदारसंघातून सह्याचे निवेदन
काँग्रेसच्या वतीने *मा. आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर* यांच्या मार्गदर्शनाखाली *स्वाक्षरी मोहीम* राबविण्यात आली. मतदार संघातील 5000 शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र आज *पालकमंत्री ना. अशोकरावजी चव्हाण साहेब यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर* यांनी सादर केले माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर यांची उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here