• Home
  • मुखेड नजीक बोलोरो गाडीचा अपघात पाच जण जखमी..

मुखेड नजीक बोलोरो गाडीचा अपघात पाच जण जखमी..

मुखेड नजीक बोलोरो गाडीचा अपघात पाच जण जखमी..जाहूर,( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
मुखेड पासून काही अंतरावर बावन वाडी शिवारात एका बोलेरो गाडीला पहाटेच्या दरम्यान अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिखली खुर्द व लेडी गुडा तालुका जि विती येथील रहिवासी असलेले माधव बापूराव शिंदे वय 36 वर्ष रेखा माधव शिंदे वय 30 वर्ष रा. दोघेही लेडी गुड्डा जिल्हा चंद्रपूर व सखुबाई हनुमंत कचल करणे वय 65 वर्ष तानाजी तुळशिराम कांबळे वय 47 वर्षे व चालक ही जत समीर सय्यद वय 27 वर्षे हे तिघे राहणार चिखली खुर्द येथील रहिवासी आहेत ते चंद्रपूर येथून उदगीर तालुक्यातील वाढवणा हंगरगा हळी येथे मुलींना दिवाळी निमित्त माहेरी घेऊन जाण्यासाठी बोलेरो गाडीने MH33A4105 जात असताना बावन वाडी जवळील चढ रस्त्यावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भागात जाऊन गाडी लिंबाच्या झाडाला धडकली. यात माधव बापूराव शिंदे रेखा माधव शिंदे सखुबाई हनुमंते तानाजी तुळशीराम कांबळे चालक ही जत समी न सय्यद हे गंभीर जखमी झाले हे तर दोघे जण किरकोळ जखमी झाले यातील चालक हीज्जत समिन सय्यद याचा गाडीचा दरवाजा व झाड यामध्ये हात अडकल्याने त्याला बाहेर निघता आले नाही घटनेची माहिती मुखेड पोलिसात कळताच पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी आडबे व चालक मुंडे यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे पाठवले चालकाचे हात गाडीच्या दरवाज्यात अडकल्यामुळे त्याला काढण्यासाठी यंत्राच्या साह्याने दार कट करून जखमी ड्रायव्हरला उपजिल्हा रुग्णालयात पाठवले त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस.एस.देवकते आरोग्य कर्मचारी विजय को नापुरे एस. एस .लोने यांनी उपचार कडून पुढील उपचारासाठी नांदेड येथे शासकीय रुग्णालयात पाठवले.

anews Banner

Leave A Comment