Home Breaking News 🛑 WhatsApp मध्ये आले फेक नोटिफिकेशन्सची सुटका करणारे फीचर, तात्काळ अपडेट करा...

🛑 WhatsApp मध्ये आले फेक नोटिफिकेशन्सची सुटका करणारे फीचर, तात्काळ अपडेट करा 🛑

89
0

🛑 WhatsApp मध्ये आले फेक नोटिफिकेशन्सची सुटका करणारे फीचर, तात्काळ अपडेट करा 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 24 ऑक्टोबर : ⭕ WhatsApp वर एक नवीन अपडेट आले आहे. नवीन अपडेट सोबत एक नवीन फीचर सुद्धा आले आहे. अँड्रॉयड आणि आयओएस दोन्हीवर युजर्संना ग्रुप्स किंवा चॅटचे नोटिफिकेशन्स नेहमीसाठी म्यूट करण्याचे ऑप्शन मिळाले आहे. जवळपास प्रत्येक युजर्सच्या व्हॉट्सअॅप मध्ये अनेक ग्रुप्स असतात ज्याचे मेंबर असणे मजबुरी असते. फॅमिली ग्रुप्स पासून काही ऑफिशल ग्रुप्स पर्यंत असू शकतात. यातील मेसेज काही कामाचे नसतात. त्यामुळे हे नेहमीसाठी म्यूट करता येवू शकते.

या फीचरची अनेक दिवसांपासून उत्सूकता होती. बीटा व्हर्जनमध्ये टेस्ट केले जात आहे. आता अँड्ऱॉयड आणि आयओएस दोन्ही ऑप्शन युजर्ससाठी रोलआउट करण्यात आले आहे. जर तुम्हाला Always चे ऑप्शन Mute Notifications सेटिंग्स मध्ये दिसत नसेल तर तात्काळ अॅप स्टोरवर जावून गुगल प्ले स्टोरवर जावून अपडेट करण्याची गरज आहे. याआधी व्हॉट्सअॅपने सर्व युजर्ससाठी अडवॉन्सड सर्चचे ऑप्शन रोलआउट केले आहे. याच्या मदतीने युजर्स व्हिडिओ, फोटोज, फाईल्स आणि यूआरएल्सला फिल्टर करून सर्च करता येवू शकते.

व्हॉट्सअॅपने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ग्रुप्समध्ये मिळत असलेले ‘Always Mute’ ऑप्शन संबंधी माहिती दिली आहे. कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपच्या Mute Notifications सेटिंग्समध्ये जा. त्या ठिकाणी १ आठवडा, ८ तास सोबत तिसरे ऑप्शन Always दिसेल. आतापर्यंत हे अलवेज एक वर्षासाठी ऑप्शन मिळत होते. परंतु, आता ते सेटिंग्स मध्ये बदलून ते कायमचे म्यूट करता येवू शकते.

आपल्या अँड्रॉयड फोन किंवा आयफोनमधील व्हॉट्सअॅप अपडेट करा. त्यानंतर अॅप ओपन कार. आता कोणत्याही चॅट किंवा ग्रुप नोटिफिकेशन्स म्यूट करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

➡️ व्हॉट्सअॅपच्या ग्रुप किंवा चॅटवर टॅप करा. ज्याला तुम्ही म्यूट करायचे आहे.

➡️ त्यानंतर उघडल्यानंतर चॅट विंडो मध्ये टॉप राइटवर दिसत असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा. सेटिंग्स मेन्यू ओपन करा.

➡️ या ठिकाणी तुम्हाला Mute Notifications ऑप्शनवर टॅप करावे लागेल.

➡️ यानंतर तुम्हाला 8 hours, 1 week और Always चे ऑप्शन दिसेल.

➡️ यावर टॅप करून तुम्ही चॅट म्यूट करू शकता. यानंतर आलेल्या मेसेजवर त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाल दिसणार नाहीत.

➡️ आता ज्यावेळी तुम्ही ओपन करून मेसेज वाचू शकाल. त्यावेळी चॅट अनम्यूट केलेले मेसेज सुद्धा वाचू शकता.⭕

Previous article🛑 राणीबागेतील फांद्याची छाटणी …! पावणे दोन कोटींच्या कंत्राटाची वाटणी 🛑
Next article🛑 खडकवासला ग्रामीण भागात नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने या भागातील शेतीचे .मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here