Home Breaking News *न्यायप्रिय महात्मा राजा रावण दहन प्रथा, कायमस्वरूपी बंद करा:आदिवासी बचाव अभियान च्या...

*न्यायप्रिय महात्मा राजा रावण दहन प्रथा, कायमस्वरूपी बंद करा:आदिवासी बचाव अभियान च्या वतीने बागलाण तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन .*

101
0

*न्यायप्रिय महात्मा राजा रावण दहन प्रथा, कायमस्वरूपी बंद करा:आदिवासी बचाव अभियान च्या वतीने बागलाण तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन .*

सटाणा,(नारायण भोये विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारस्याचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे.महात्मा राजा रावण हे विविध गुणांचा समुच्चय आहे.महान,दार्शनिक,संगीतज्ञ,राजनीतीतज्ञ,शिल्पकार,आयुर्वेदाचार्य,विवेकवादी,उत्कृष्ट,नगररचनाकार,समताधिष्ठित,समाजव्यवस्थेचा उद्गाता,साहित्यिक,न्यायप्रिय राजा असून देवांचा देव शंकराला प्रसन्न करणारा पहिला भक्त,अशा अनेक गुणांचा अविष्कार असणारा महात्मा राजा होता.अशा महान राजाला इथल्या षड्यंत्रकारी,वर्णांध व्यवस्थेने बदनाम करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही.त्यांस खलनायक म्हणून प्रसिद्ध केले आहे.परंतु सत्य लपून रहात नाही.ते कधीनाकधी उघड होतेच.आदिवासी समाजातील व इतर समाजातील संशोधक, साहित्यिक यांनी महात्मा राजा रावण यांचा खरा इतिहास शोधून काढला व जगासमोर मांडला आहे.वास्तविक राजा रावण सारखा महापराक्रमी योद्धा झाला नाही.आणि यापुढे होणारही नाही.तामिळनाडूमध्ये रावणाची ३५२ मंदिरे आहेत.सर्वात मोठी मूर्ती मध्येप्रदेशात मंदसौर येथे अंदाजे १५मिटर उंचीची आहे.छत्तीसगड,मध्यप्रदेश,झारखंड,महाराष्ट्रातही अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह सर्वत्र राज्यभर महात्मा राजा रावणाची पूजा केली जाते.रावण हे आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान व दैवत आहेत.परंतु आदिवासींच्या या समताधिष्ठित समाजव्यवस्थेचा उद्गाता असलेल्या,न्यायप्रिय राजा रावणाला जाळण्याची कुप्रथा व परंपरा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आली आहे.त्यामुळे देशातील आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. म्हणून रावण दहन करण्याची परवानगी कोणालाही देऊच नये तर ही प्रथाच बंद करण्यात यावी.
दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याचा प्रयत्न केला गेला तर ,सर्व आदिवासी समाजाकडून तीव्र स्वरूपात जाहीर निषेध व्यक्त करण्यात येईल.या दरम्यान जे सवर्ण या विकृत विक्षिप्त कृतीचे समर्थन करतील,आमच्या आदिवासी बांधवांच्या भावना दुखावतील ,आमच्या न्यायप्रिय राजाला अपमानित करतील अशा लोकांविरुद्ध अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत तसेच,भारतीय दंड संहिता १८६० अंतर्गत १५३(अ),२९५,२९८,मुंबई पोलिस अँक्टनुसार १३१,१३४,१३५ कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
आमच्या आदिवासी समाजात आता जागरूकता निर्माण झाली आहे.सद्सदविवेकबुद्धीचा आता आमचा समाज वापर करू लागला आहे.त्यामुळे आमच्या आदिवासी समाजाच्या धार्मिक भावनांवर कोणीही घाला घालण्याचा प्रयत्न करू नये . अशी मागणी आदिवासी बचाव अभियान बागलाण यांनी केली आहे.या प्रसंगी

Previous articleनांदेड जिल्हा भाजपा चा बालेकिल्ला बनविण्यासाठी पदाधिकार्‍यांनी आक्रमक पणे काम करावे – खा. चिखलीकर
Next article*नांदेडच्या जाहूरमध्ये तलावात बुडून युवकाचा मृत्यू*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here