Home Breaking News *नांदेडच्या जाहूरमध्ये तलावात बुडून युवकाचा मृत्यू*

*नांदेडच्या जाहूरमध्ये तलावात बुडून युवकाचा मृत्यू*

165
0

*नांदेडच्या जाहूरमध्ये तलावात बुडून युवकाचा मृत्यू* जाहूर( मनोज बिरादार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-नांदेडच्या मुखेड तालुक्यातील जाहूर येथील तलावात बुडून तरुणाचा मृत्यू दिनांक २१ ऑक्टोबर रोजी जाहूर येथील तलावात मित्रासोबत पाण्यात गेला असता बुडून मरण पावला आहे तलावात बुडून मृत्यू पावल्याची घटना जाहूरयेथे घडली आहे तब्बल ३१ तासानंतर त्याचा मृतदेह प्रशासनाच्या हाती लागला आहे मयत माधव भुयारे हा अत्यंत हुशार व होतकरू विद्यार्थी होता नुकतीच १७ ऑक्टोंबर रोजी पॉलिटेक्निक चा पेपर दिल्याचे त्याच्या नातिका नातेवाईकांनी सांगितले आहे माधव भुयारे यांच्या मृत्यूमुळे जाहूर गावावर शोककळा पसरली आहे त्यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी त्याचे मित्र आनंदा सावर माळे व प्रकाश कोंडा वार यांच्यासह गावातील अनेक तरुणांनी सहकार्य केले या तलावातून त्याचा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर पोस्टमार्टम करून अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस प्रशासनाचे बीड जमादार श्री एस पी सवई सर व गंगाधर चिंचोले सर उपस्थित होते त्यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here