*पराधीन आहे पुत्र जगती मानवाचा* *बजाबाई आत्माराम बोरसे ” तात विलीन*
वाचकहो,
या भुतरलावर जन्माला येणारा प्रत्येक व्यक्ती हा एक ना दिवस दुर इहलोकीच्या प्रवासाला निघून जाणार आहे.मागे उरणार आहेत,फक्त केलेल्या चांगल्या कर्तृत्वाची कामगिरीची नामोल्लेखनीय कामगिरी.आज अशाच एका गरीब कुटूंबात जन्म झालेल्या मायमाऊली बजाबाईचा कार्यकर्तृत्वाचा हा लेखाजोखा त्यांना श्रध्दांजलीपर अर्पण करीत आहोत.
-व्यवस्थापकीय संपादक
बजाबाईंचा जन्म एका गरीब कुटूंबात वडेल,ता.मालेगांव या गावी झाला.विवाहानंतर त्या मालेगांवजवळील म्हाळदे गांवी आत्माराम रतन बोरसे यांच्या सुविद्य पत्नी म्हणून ख-या अर्थाने म्हळदेवासिय झाल्या.आत्माराम रतन बोरसे म्हणजे वर्षानूवर्ष म्हाळदे गांवचे सरपंच व सोसायटीचे चेअरमन म्हणून कार्यरत राहिलेले व्यक्तीमत्व.मालेगांव पंचायत समितीचे सदस्य असे वेगवेगळी पदे भुषविणारे आत्माराम बोरसे यांच्या घराची खरे तर गृहमंत्री म्हणून बजाबाईनी व्यशस्वीरित्या कामगिरी पेलली.संसाराचा गाडा हाकताना पती आत्माराम बोरसे यांच्या खांद्याला खांदा लावून बजाबाईनी आपली कामगिरी व्यशस्वीरित्या पार पाडली.कुटूंबात एकूण तीन मुले व दोन मुली त्याशिवाय उतम बोरसे या दिराचा एक मुलगा या सगळ्यांना एकत्रित कुटूंबात सांभाळून ठेवण्याची अनोखी कर्तबगारी बजाबाईनी लिलया पार पाडली.म्हाळदे गावातील कोणत्याही जाती धर्माच्या व्यक्तीचे सुख दुःख असो बजाबाई त्यात हमखास सहभागी होऊन गोरगरीबांना आधार देत व त्यांची मायेने विचारपूस करीत.मुळातच धार्मिक व वारकरी सांप्रदायाच्या असलेल्या बजाबाई यांनी अनेकदा पंढरपूर त्र्यंबकेश्वर आळंदीच्या पायी वा-या देखील केल्यात.त्याशिवाय पायी जाणाऱ्या दिंडयाना भोजन केल्याशिवाय त्यांनी कधी जाऊच दिले नाही.अशा या म्हाळदे वासियांच्या मायमाऊलीचे दिनांक १५आँक्टोबर २०२० रोजी सकाळच्या रामप्रहरी झोपेतच असताना वार्धक्याने वयाच्या ७० व्या निधन झाले,व त्या आपली कर्तबगारी मागे सोडून दुर अनंताच्या प्रवासाला निघून गेल्यात.बोरसे कुटूंबियावर कोसळलेल्या या दुःखात “युवा मराठा”परिवार सहभागी असून,परमेश्वर बजाबाईच्या मृतात्म्यांस चिरशांती देवो हिच प्रार्थना!